एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गुलिगत सूरज चव्हाणला 'शिंदे शाही' कुटुंबाकडून खास गिफ्ट! आनंद शिंदे गाणार तर सूरज नाचणार...

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : सूरजसाठी आनंद शिंदे आणि कुटुंबाने खास गिफ्ट दिले आहे. 'शिंदे शाही' कुटुंबाकडून सूरजसाठी खास गाणं तयार होणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा यंदाच्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) सातवा आठवडा सुरू  झाला आहे. या सीझनमधील घरातील प्रत्येक सदस्याने आपली छाप सोडली आहे.  या सीझनमध्ये 'गुलिगत' फेम सूरज चव्हाणने आपल्या खेळाने आणि स्वभावाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. सूरज चव्हाणच्या फॅन फॉलोईंगमध्येही मोठी वाढ झाली आहे. आता, सूरजसाठी आनंद शिंदे आणि कुटुंबाने खास गिफ्ट दिले आहे. 'शिंदे शाही' कुटुंबाकडून सूरजसाठी खास गाणं तयार होणार आहे. या गाण्याला आनंद शिंदे यांचा स्वर असणार असून सूरज चव्हाण हा स्वत: त्या व्हिडीओत दिसणार आहे.

 'बिग बॉस मराठी'मध्ये वीकेंडला भाऊचा धक्क्यावर गणेशोत्सव स्पेशल एपिसोड पार पडला. अंकिता प्रभू वालावकर, पॅडी कांबळे अशी कोकणातील मंडळीही बिग बॉस मराठीच्या घरात आहेत आणि यंदाचे गणपती त्यांचे चुकलेत. अंकिताने अनेकदा याबद्दल तिची नाराजीही व्यक्त केली होती. अशातच  बिग बॉस मराठी सार्वजनिक गणेसोत्सव मंडळात सदस्यांना स्पेशल गिफ्ट्स देण्यात आले. बिग बॉस सीझन 3 चा खेळाडू आणि  गायक-संगीतकार-अभिनेता डॉ. उत्कर्ष शिंदे याने घरातील काही सदस्यांना गिफ्टस दिले. 

उत्कर्षने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सदस्यांसोबत सजावटीचा टास्क खेळला. रितेश देशमुखने स्पर्धकांसाठी गिफ्ट्स पाठवले होते. हे गिफ्ट्स उत्कर्षने घरात सदस्यांना दिले. या गिफ्टमुळे घरातील वातावरण भावुक झालेले पाहायला मिळाले. रितेशने या गिफ्ट्सच्या माध्यमातून काही फोटो पाठवले होते. ज्यामध्ये सदस्यांच्या घरातील गणपतीचा फोटो आणि कुटुंबियांचा फोटो होता. तर, इतर काही सदस्यांसोबत सूरजलादेखील काहीही गिफ्ट्स मिळाले नाहीत. पण, उत्कर्षने आपण सूरजला एक खास गिफ्ट देणार असल्याचे जाहीर केले. 

शिंदे कुटुंबाकडून सूरजला गिफ्ट...

उत्कर्षने म्हटले की, ''जान्हवी गिफ्ट मिळालं, अंकिताला मिळालं, डीपी दादा मिळालं, वैभवला मिळालं, पण सूरजचं काय? मी आता आलोच आहे. तर मी तुला भाऊ म्हणून एक गिफ्ट देतो. तुझ्यासाठी आम्ही शिंदेशाही कुटुंब एक गाणं बनवणार. हे गाणं आनंद शिंदे गातील. तू घरात 'कोंबडी पळाली' या गाण्यावर डान्स केला होतास, तसं हे गाणं असेल.  एवढंच नव्हे तर तू त्या गाण्यात अभिनय पण करणार असल्याचे उत्कर्षने सूरजला सांगितले. उत्कर्षच्या या खास गिफ्टवर सूरजने आनंद व्यक्त करताना आभार मानले. तर, घरातील सदस्यांनीदेखील या आनंद व्यक्त केला. 

इतर संबंधित बातमी :

 

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget