Bigg Boss Marathi New Season Day 26 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi new Season) नवा सीझन सध्या धमाका करत आहे. या सीझनमधील सर्वच कल्लाकार प्रेक्षकांची मने जिंकून घेतल्याचंही पाहायला मिळतंय. आजच्या भागात 'बिग बॉस मराठी'च्या घरात आर्या, निक्की आणि जान्हवीचा कल्ला होताना दिसून येणार आहे. आता या तिघींना कोण शांत करणार हे पाहावे लागेल.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी म्हणत आहे,"बिग बॉस' मी स्वत:ला सांभाळू शकत नाही". पुढे आर्याला निक्की म्हणते,"माझ्या पांघरुनला हात लावायचा नाही". आर्या म्हणते,"दम असेल तर मला फोडून दाखव". तिघींमध्ये नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागेल.
निक्की बदलली असल्याचा अरबाजला संशय
'बिग बॉस मराठी'च्या घराची निक्की आता कॅप्टन झाली आहे. कॅप्टन झाल्यानंतर निक्की बदलली असल्याचा अरबाजला आणि जान्हवीला संशय आला आहे. याबद्दल आजच्या भागात अरबाज, निक्की आणि घन:श्याममध्ये आजच्या भागात चर्चा होणार आहे.
निकी गँगविरोधात तगडा गेम प्लॅन
'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 5) नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यातच सूरज चव्हाणची वेगळी फॅन फॉलोईंग पाहायला मिळत आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार आहे.
निक्की तांबोळी नवीन कॅप्टन
निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन बनली आहे, त्यामुळे ती नॉमिनेशनपासून सुरक्षित झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत. या आठवड्यात कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठीच घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.