Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे दोन टीम पडल्या असताना त्यातीलच काही सदस्यांचं काही बाबतीत एकमत होताना दिसत आहे. एकीकडे निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांची मैत्री घरातील सदस्यांना खटकताना दिसत आहे. त्यातच दुसरीकडे अभिजीत दोन दगडांवर पाय ठेवून खेळत असल्याचं अनेकांना वाटतंय. यामध्ये अंकिता वालावलकर, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण या सदस्यांचा समावेश आहे.
'अरबाज-वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न'
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) आजच्या भागात अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) अरबाज आणि वैभवसोबत अभिजीत विरोधात बोलताना दिसणार आहे. अभिजीत दोन्ही टीममधून खेळतोय, असं या सदस्यांना वाटतंय. अंकिता म्हणते की, जो माणूस दुसऱ्यासाठी स्टँड घेणार असतो, तो ते पहिल्यापासून घेतो. अंकिता अरबाज आणि वैभवसोबत अभिजीतच्या गेमविषयी चर्चा करताना दिसणार आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी अंकितावर निशाणा साधला आहे.
पाहा बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो
अभिजीतची चुगली करणाऱ्या अंकिताला नेटकऱ्यांनी झापलं
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे की अरबाज आणि वैभव अंकिताला अभिजीत विरोधात सगळं सांगत आहे. तर निक्की समोर अभिजीत स्टँड घेत नाही, असं अंकिताचं म्हणणं आहे. दरम्यान, टीम बी मधील अंकिता टीम ए मधील अरबाज, वैभव आणि धनश्या:म समोर अभिजीत विरोधात बोलत आहे. यामुळे ट्रोलर्सनं तिलाच निशाण्यावर धरलं आहे. अरबाज आणि वैभव टीम बी फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय?
अंकिता वालावलकरच्या वर्तनावर नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला मूर्ख म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी यासंदर्भात कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, "अभिजीत कधीच तुमच्याबद्दल वाईट बोलला नाही, अजूनपर्यंत पण तू कायमच त्याच्यावर जळत आलीयस." दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, "ही मूर्ख आहे. हिला स्वत:चा गेम नाही. दुसरा गेम खेळतो, तर हिल बघवत नाही. ही स्वत:च्या टीममधील सदस्याच्या विरोधात बोलते". तिसऱ्याने म्हटलंय की, "ही अंकिता तोंडावर बोलायची हिम्मत ठेवत नाही, तिच्याच ग्रुपच्या लोकांना कायम नाव ठेवत असते आणि चुगल्या करत असते". आणखी एकाने लिहिलंय, "अरे ते अरबाज आणि बैलभव टीम B फोडण्याचा प्रयत्न करत आहे अंकिता, कळत कसं नाही तुला".
महत्त्वाच्या इतर बातम्या :