Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम तयार झाल्या आहेत. असं असलं तरी, टीम एमधील निक्की आणि टीम बीमधील अभिजीत सावंत या दोघांची टीम पलिकजे चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं, मात्र आता टीम बीमधील सदस्यांनाही या मैत्रीवर आक्षेप असल्याचं दिसत आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे.


निक्की-अभिजीतची मैत्रीवर इतर सदस्यांना खटकली 


बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) आजच्या एपिसोडमध्ये निक्की (Nikki Tamboli) आणि अभिजीतची (Abhijeet Sawant) मैत्री हा चर्चेचा विषय ठरणार असून त्याचा प्रोमो समोर आला आहे. अरबाज म्हणतो, "इकडे बोलतो तू सॉरी बोलतो, पण मनापासून बोलत नाही, ती आली तर तो तसं बोलला नाही. उलट बोलतो, ती सॉरी बोलते असं". यावेळी वैभव म्हणाला की, "मी पण त्याचं मत विचारलं. मी त्याला असं नाही म्हटलं कीपटवून दे कर बाकीच्यांना". यावर अंकिता अरबाज आणि वैभला म्हणते की, "मला तुझे मुद्दे पटत नाहीत, मी तोंडावर सांगते, तुझे पटत नाहीत, तेही मी तोंडावर सांगते. सूरजला गेम का कळतो माहितंय, एवढ्या सगळ्या आमच्या चर्चेमध्ये सूरज बोलतो, 'दादा, तू भितोस तिला, हे सूरजचं वाक्य आहे".






"दोन लोकांमध्ये मैत्री असू शकते"


दुसऱ्या बाजूला निक्की आणि अभिजीत एकमेंकांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी निक्की म्हणते, "ग्रुप पडल्यामुळे काही समजतच नाही. त्या दिवशी वीकेंडच्या वारला सर म्हणाले, तुझी आणि माझी मैत्री असू शकते, ती खरी असू शकते. पण हे माझ्या टीमला मान्य नाही, त्यांना असं वाटतंय तू माझ्याशी गेम खेळतोय. आता यावर मी काय बोलू. दोन लोकांमध्ये मैत्री असू शकते". यावर अभिजीत म्हणतो, "हेच मी त्यांना सांगतोय".


 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi 5 : "तू नड, मी हाय, जिथं अत्याचार, तिथं सूरज खंबीर"; आर्याला गुलीगत सूरजचा फुल्ल पाठिंबा, अभिजीतलाही दिलं वचन