Bigg Boss Marathi Season 5 Day 17 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) सध्या सुरू आहे. बिग बॉसच्या घरात टास्कच्या दरम्यान वादावादी सुरू असते. यातून अनेकदा घरातील स्पर्धक आक्रमक होतात. मात्र, सोमवारी बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये घरातील सदस्य भावशून्य होऊन खेळले. त्यामुळे आता बिग बॉस नाराज झाले असून घरातील सदस्यांविरोधात अॅक्शन घेणार आहेत. 


'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचं दु:खदेखील दिले. घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण, मंगळवारच्या भागात टास्कच्या खेळात सदस्य आक्रमक झालेले दिसतात. बिग बॉसच्या घरात टास्कच्या दरम्यान भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आले. त्यामुळे आता 'बिग बॉस' काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे. 


बिग बॉसच्या घरात चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य त्यांच्यासोबत जोडले गेले. सदस्य या पाहुण्यांसोबत वेळ घालवताना दिसून आले. तर काहींनी या पाहुण्यांवरुन भांडणेदेखील केली. पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला. पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी काही टास्क बिग बॉसने दिले होते. या टास्क दरम्यान दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे दिसून आले. घरातील सदस्यांमध्ये बाळांना घेऊन झटापटही झाल्याचे प्रोमोमध्ये दिसून आले. यात बाळाच्या बाहुलीचे नुकसान झाले. 






'कलर्स मराठी'ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोनुसार, बिग बॉसने दिलेले कार्य पूर्ण करताना, प्रतिस्पर्धी गटावर कुरघोडी करताना पाहुण्यांचेही हाल झाले. त्यामुळे बिग बॉसने नाराजी व्यक्त केली आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"हा खेळ मानवी भावनांचा आहे. दोन्ही टीम भावनाशून्य होऊन खेळलात. त्यामुळे मीदेखील आता भावनाशून्य होऊन...". घरातील सदस्य भावनाशून्य खेळल्याने बिग बॉस सदस्यांना काय शिक्षा देणार हे पाहावे लागणार आहे. 


योगिताने बिग बॉसकडे केली मागणी...


दरम्यान, सोमवारच्या एपिसोडमध्ये निक्की आणि घरातील सदस्यांनी घातलेल्या राड्यामुळे योगिता चव्हाण मानसिक तणावात दिसली. योगिताने हे सगळं असह्य होत असून खूपच मानसिक त्रास होत असल्याचे योगिताने सांगितले. आपल्याला हा शो सोडायचा असून घरी जाऊ द्यावे असे योगिताने म्हटले. यावर बिग बॉसने तिची समजूत काढत खेळात सक्रीय राहण्याची सूचना केली.