Shiva Marathi Serial : 'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' (Shiva) ही मालिका (Marathi Serial) अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि शाल्व खिंजवडेकर हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत. ज्या परिस्थितीमध्ये शिवा आणि आशुचं लग्न झालं, त्यामुळे शिवा आशुला बायको म्हणून स्वीकारण्यास तयार नाही. पण तरीही जेव्हा शिवावर आरोप केले जातात,त्यावेळी तो तिची भक्कम बाजू घेतो. म्हणून आता शिवा आणि आशुचं नातं कोणतं नवं वळण घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. आशू आणि शिवा देसाई घरी पोहोचतात. वस्तीत आणि शिवाच्या घरच्यांनी आशूचा खूप प्रेमाने त्याचा पाहुणचार केल्यामुळे त्याला घटस्फोटाचा विषय काढता येत नाही असं तो सिताईला सांगतो. सिताई शिवाला तिच्या वचनाची आठवण करून देते आणि आशुला घटस्फोट दे असं सांगते. शिवाला या सगळ्याच खूप वाईट वाटतं शिवा आशुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेते. सिताईच्या हातात सह्या केलेले पेपर देताना शिवा येत्या सहा महिन्यात देसाई घराण्याची सून म्हणून स्वतःला सिद्ध करेन असे चॅलेंज देते.
परिपूर्ण सून होण्याचे शिवाचे प्रयत्न
घरी नागपंचमीची पूजा करण्यासाठी शिवा नैवेद्याचे दिंड बनवण्याचे ठरवते. सीताई उर्मिलाला शिवाला मदत न करण्याचा सल्ला देते. शिवा एकदम वेगळ्याच रंगात आणि ढंगात वावरत असते. शिवा पुरणाची दिंड खूप उत्कृष्ट बनवते. यावरून सीताईला वाटते तिला नक्कीच कोणीतरी मदत केली असेल. दिंड खराब करण्याचा कीर्ती प्लॅन बनवते. पण शिवा तो प्लान तिच्यावरच उलटवून लावते. उर्मिला सिताईच्या डोक्याला तेल लावत असताना शिवा हळूच येते आणि स्वतःहून सिताईच्या डोक्याला तेल लावते हे जेंव्हा सिताईच्या लक्षात येतं तेव्हा सिताई नाराज होते. एकूणच काय तर शिवा एक परिपूर्ण सुनेसारखी वागायला लागल्याचे दिसून येतंय.
आशु घेणार शिवाची बाजू
देसाईंच्या घरात शिवाची मंगळागौर साजरी करण्याची लगबग सुरु होते. मंगळागौरीच्या कार्यक्रमात सिताई, शिवा आणि सगळ्या बायका मिळून फुगडी खेळतात. जगदीशची म्हणजेच शिवाच्या काकाची बायको वेळ मिळताच सिताईला शिवाने आमचे घर बळकावलं आहे असं सांगते. यावरून सिताई शिवाला जाब विचारायला जाते तेव्हा आशू शिवाची बाजू घेऊन जगदीश काका खूप कट कारस्थानी असल्याचं सांगतो. शिवासाठी, आशुने घेतलेलं हे पाऊल त्यांच्या नात्यात गोडवा आणेल का ? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.