Bhaucha Dhakka :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून देत असतो. या आठवड्यात त्याने निक्कीसह (Nikki Tamboli) अरबाजचा (Arbaz Patel) देखील चांगलाच क्लास घेतला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घराची क्वीन निक्की स्वत:ला मानते. तर या क्वीनच्या चुका कव्हर करणारा अरबाज पटेल आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ घरातील सदस्यांना अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायपुढे येत होता का? असा प्रश्न विचारताना दिसणार आहे.                                            


अरबाजने गेला आठवडाभर धिंगाणा घातला होता. निक्कीला दूर ठेवा, मला त्रास होतोय असं म्हणत सर्व घराचं लक्ष त्याने स्वत:कडे ओढून घेतलं होतं. त्याचा त्रास पाहून घरातील सर्व सदस्यांनी त्याची मदत केली. त्याच्याबाजूने भांडले. पण भाऊचा धक्का झाल्यानंतर एका क्षणात त्याने पलटी मारली. त्यामुळे यासंदर्भात रितेश भाऊ अरबाजची शाळा घेणार आहे.                                           


'अरबाज निक्कीचं पायपुसणं...'


भाऊच्या धक्क्याचा समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,"अरबाज स्ट्राँग प्लेअर ही इमेज तुम्ही जी तयार केली होती ती मातीत मिळवली आहे. त्यावर अरबाज म्हणतो,"सर मी केअर करतोय कोणाची तरी". त्यावर अरबाजला थांबवत रितेश भाऊ म्हणतो,"तुम्हाला समजत नाही...तुम्ही केअर करताय असं तुम्हाला वाटतं". त्यानंतर घरातील इतर सदस्यांना रितेश भाऊ प्रश्न विचारतो की,"इथे कोणाला वाटतं अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायापुढे येत होता?". 


दरम्यान भाऊच्या धक्क्यावर निक्कीलाही आजवरचा सगळ्यात मोठा धक्का बसला असून तिला आता संपूर्ण सीझन कॅप्टन होता येणार नाहीये. त्यामुळे घरातल्यांनाही मोठा धक्का बसला असून निक्कीच्या वागण्यावर रितेश भाऊंनी तिची चांगलीच शाळा घेतली. 






ही बातमी वाचा : 


Kareena Kapoor:  शाहरुख एवढं मानधन मागितलं अन् करिनाच्या हातून गेला ब्लॉकबास्टर सिनेमा