एक्स्प्लोर

'बिग बॉस'च्या शाळेत इव्हेंच्युअली बिचुकले गुरुजी देणार इंग्रजीचे धडे

बिग बॉसच्या घरात 'शाळा सुटली पाटी फुटली' या साप्ताहिक कार्यात अभिजीत बिचुकले शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणार की विद्यार्थीच त्यांची शाळा घेणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या आठवड्यापासूनच घरातल्या एका सदस्याने इतर सदस्यांसोबतच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो सदस्य म्हणजे साताऱ्याचे अभिजीत बिचुकले. इव्हेंच्युली, अॅक्सिडेंटली यासारख्या शब्दांची पेरणी करत आपल्या अनोख्या इंग्रजीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या बिचुकलेंना बिग बॉसने इंग्रजीची शिकवणी घेण्याचा टास्क सोपवला आहे. सुरुवातीच्या आठवड्यात बिचुकलेंचं वागणं खटकल्यामुळे घरातल्या सगळ्याच सदस्यांनी त्यांना आपलं लक्ष्य केलं होतं. पण हळूहळू बिचुकलेंनी सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. त्यामुळे बिचुकलेंचा लळा अनेक सहस्पर्धकांना लागला. कधी रुपालीसोबत झालेलं भांडण असेल किंवा सिक्रेट स्ट्रॅटेजी असेल, बिचुकले कमालीचे प्रसिद्ध झाले आहेत. पण या सगळ्यात त्यांची आणखी एक गोष्ट सुपर डुपर हिट झाली आहे ते म्हणजे त्यांचं भन्नाट इंग्रजी. बिग बॉसच्या घरात सध्या 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. आणि या साप्ताहिक कार्यात आता बिचुकले शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तेही साधेसुधे शिक्षक नाही बरं का. चक्क इंग्रजीचे शिक्षक. आता भन्नाट इंग्रजी असलेले आपले हे बिचुकले गुरुजी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणार की विद्यार्थीच त्यांची शाळा घेणार हे भागात समजेल. सतत वादात अडकूनही सलग दोन आठवडे उत्कृष्ट खेळाडू ठरलेला शेफ पराग कान्हेरे स्वयंपाकघर सोडून थेट शाळेच्या वर्गात गेला आहे, तेही शिक्षक म्हणून. पण यावेळी तो पाककौशल्याचे धडे द्यायचं सोडून विद्यार्थ्यांना प्रेमसाधना करायला शिकवणार आहे. सुरुवातीपासूनच रुपाली आणि त्याच्यात वाढत जाणारी मैत्री ही बिग बॉसच्या घरातला चर्चेचा विषय ठरली आहे. आमच्यात केवळ मैत्री आहे असा दावा करणाऱ्या या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे, अशी शंका दुसऱ्या गोटातल्या सदस्यांना आहे. त्यामुळेच एरवी स्वतःच्या पाककौशल्याचे गोडवे गाणारा पराग आज मात्र रुपाली साठी प्रेमगीत गाताना दिसणार आहे. आधीच्या भागात किशोरी शहाणे यांच्या टीमने शिक्षकाची भूमिका बजावली. मुख्याध्यापिकेची भूमिका किशोरी शहाणेंकडे होती. त्यावेळी मराठी शिकवण्याची जबाबदारी शिव ठाकरेवर होती. नेहासोबत उडालेल्या खटक्यांमुळे त्याने तिला 'नापासा'चा शेरा दिला, तर रुपालीने गृहविज्ञानाच्या वर्गात बिचुकलेंना नापास केलं. त्यामुळे बिचुकले याचा वचपा काढणार का, हे सुद्धा उत्सुकतेचं ठरणार आहे. गेल्या आठवड्यात 'वीकेंडचा डाव'मध्ये महेश मांजरेकरांनी बिचुकलेंना सुरेखा पुणेकरांशी इंग्रजीत संभाषण करायला लावलं होतं. त्यामुळे बिग बॉसही इंग्रजीवरुन त्यांची फिरकी घेणार हे साहजिक होतं. अभिनेत्री मैथिली जावकर ही बिग बॉसच्या घरातून बाद झालेली पहिली स्पर्धक होती. आता चौदा स्पर्धक खेळात असून यंदा पराग, नेहा, दिगंबर, माधव, किशोरी आणि अभिजीत बिचुकले नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोण बाद होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget