एक्स्प्लोर

'बिग बॉस मराठी'मध्ये देवदत्त नागे-विशाखा सुभेदार?

'जय मल्हार' मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहचलेला लाडका अभिनेता देवदत्त नागे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये झळकण्याची शक्यता आहे.

मुंबई : जगभरातील टेलिविश्वात धुमाकूळ घालणारा 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या घरात कोणते सेलिब्रेटी सहभागी होणार, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील आणखी दोन संभाव्य स्पर्धकांची नावं 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहेत. 'जय मल्हार' मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहचलेला लाडका अभिनेता देवदत्त नागे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये झळकण्याची शक्यता आहे. 'फू बाई फू'च्या पहिल्या पर्वाची विजेती, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारही बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याची चिन्हं आहेत. विशाखा नुकतीच कलर्सवरील 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली होती. बिग बॉसच्या घरात कोण कोण दिसण्याची शक्यता? अभिनेता देवदत्त नागे विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी अभिनेता विकास पाटील अभिनेता आस्ताद काळे चित्रपट अभिनेता पुष्कर जोग चित्रपट अभिनेता राजेश श्रुंगारपुरे चित्रपट अभिनेत्री रेशम टिपणीस अभिनेत्री मेघा धाडे शेफ विष्णू मनोहर किंवा पराग कान्हेरे 'एमटीव्ही रोडिज्'मधील मराठी चेहरा वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’ची लोकप्रियता अनेकांना माहित आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या 15 एप्रिलपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरु होत आहे. मांजरेकर बिग बॉस मराठी मनोरंजन विश्वाचे बिग बॉस असलेल्या महेश मांजरेकर यांच्या हाती ' मराठी बिग बॉस'ची सूत्रं आहेत. हिंदी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन अर्शद वारसीने केलं होतं. दुसऱ्या पर्वात शिल्पा शेट्टी, तिसऱ्यात खुद्द बिग बी अमिताभ बच्चन होस्टच्या भूमिकेत होते. चौथ्या पर्वानंतर मात्र अकराव्या सिझनपर्यंत ही दोर सलमानच्या हाती राहिली. हिंदीची परंपरा हिंदी बिग बॉसमध्ये प्रत्येक क्षेत्रातून एखादा सेलिब्रेटी घेण्याची परंपरा अकरा सिझनमध्ये सुरु आहे. रिअॅलिटी शो विजेता, ब्यूटी पेजंट विजेती, मॉडेल, आयटम गर्ल, डेली सोप स्टार, चित्रपट अभिनेता-अभिनेत्री, विनोदी अभिनेता, चित्रपटातून लुप्त झालेले सेलिब्रेटी, राजकीय व्यक्ती, एलजीबीटी समुदायातील व्यक्ती, कायदा मोडल्याने चर्चेत आलेला सेलिब्रेटी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार, गायक, क्रीडापटू, फॅशन डिझायनर अशा विविध पार्श्वभूमीचे कलाकार निवडले जातात. नियम मोडल्यास हिंदी बिग बॉसमध्ये 50 लाख रुपये दंड होता. मात्र मराठीत तो तब्बल दोन कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धक सहभाग घेण्यापूर्वी विचार करुनच निर्णय घेतील हे मात्र नक्की. हिंदी बिग बॉसमध्ये टोकाचे वाद, शिवीगाळ अशा प्रकारांमुळे ही मालिका नेहमीच वादात राहिली. मात्र मराठी कलाकारांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे या पहिल्याच पर्वात काय होतं, याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
'मराठी बिग बॉस'च्या घरात कोण जाणार?
राजेश, मेघा, सुशांतसह विकास पाटीलही 'बिग बॉस'च्या घरात?

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Embed widget