एक्स्प्लोर

बिग बॉस मराठी : अभिनेता सुशांत शेलार घराबाहेर

अभिनेता सुशांत शेलारवर वैद्यकीय कारणांमुळे 'बिग बॉस'चं घर सोडण्याची वेळ आली.

मुंबई : मराठी बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाने अचानक एक्झिट घेतली आहे. अभिनेता सुशांत शेलारवर वैद्यकीय कारणांमुळे स्पर्धा अर्ध्यात सोडण्याची वेळ आली. सुशांत या आठवड्यात मराठी बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होता. दोनच दिवसांपूर्वी वैद्यकीय चाचण्यांसाठी सुशांतला बिग बॉसच्या घरातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर सुशांतने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुशांत काही दिवसांनी शोमध्ये पुनरागमन करु शकतो, असंही म्हटलं जात आहे. सुशांतला सिव्हिअर अॅसिडीटीचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. भूषण कडूला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनी याविषयी कल्पना दिली. त्यानंतर सुशांतचं सामान त्याच्या बॅगांमध्ये भरुन नावाच्या पाटीसह स्टोअर रुममध्ये जमा करण्यात आलं. सुशांत अनेक वेळा कुटुंबीयांच्या आठवणींना व्याकुळ झालेला प्रेक्षकांनी पाहिला आहे. काही वेळा सुशांतचा पारा चढल्याचंही दिसलं आहे. आता प्रकृती खालावल्यामुळे सुशांत बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला आहे. यापूर्वी ऋतुजा धर्माधिकारीनेही वैद्यकीय कारणांमुळे स्पर्धा सोडली होती. सुशांत हा मेडिकल कारणामुळे स्पर्धा सोडावा लागलेला दुसरा स्पर्धक ठरला आहे. सुशांतच्या गच्छंतीनंतर घरात 11 स्पर्धक राहिले आहेत. काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी, जुई गडकरी, सुशांत शेलार हे सात स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे. मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, भूषण कडू, स्मिता गोंदकर या आठ स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर, नंदकिशोर चौगुले हे तिघे जण सध्या घरात आहेत. या आठवड्यात मेघा, उषा, आस्ताद, रेशम, भूषण आणि त्यागराज हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यापैकी येत्या रविवारी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

बर्थ डे स्पेशल : मेघा धाडेबद्दलच्या रंजक गोष्टी

'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री

बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे

राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर

बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद

रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार

बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते

बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला दमदार सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget