एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 Latest Update : 'बिग बॉस मराठी'तून महेश मांजरेकरांनी एक्झिट का घेतली? ही गोष्ट ठरली कारणीभूत!

Bigg Boss Marathi 5 Latest Update  : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण महेश मांजेरकर हे शो होस्ट का करत नाही, याची चर्चा सुरू आहे.

Bigg Boss Marathi 5 Latest Update  : छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेला 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) या रिएल्टी शोची  अधिकृत घोषणा करण्यात आली.यंदा 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व असणार आहे. शोची अधिकृत घोषणा  झाल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. त्याचे कारणही तसेच होते.  या सीझनचा होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी  रितेश देशमुख असणार आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा कार्यक्रम होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण महेश मांजेरकर हे शो होस्ट का करत नाही, याची चर्चा सुरू आहे. 

 कलर्स मराठी आणि JioCinema वर 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी 'बिग बॉस मराठी'चे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. 'कलर्स मराठी'च्या घोषणेनंतर बिग बॉस मराठीचे चाहते उत्सुक दिसले. तर, महेश मांजरेकर यांनीच हा शो होस्ट करायला पाहिजे होता, असाही सूर शोच्या चाहत्यांनी लावला होता. मात्र, महेश मांजरेकर हा शो होस्ट का करत नाही, याची चर्चा सुरू झाली. 

महेश मांजरेकर यांची एक्झिट का?

महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या आधीच्या चारही सीझनचे होस्ट म्हणून जबाबदारी पार पाडली होती. महेश मांजरेकर यांचे सडतोड वक्तव्य, एखादा स्पर्धक चुकला असेल तर त्याला सुनावणे, स्पर्धकांना अप्रत्यक्षपणे समज देऊन त्याचा गेम सुधरवणे आदी बाबींमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. 

आता, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये महेश मांजरेकर नसणार आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, महेश मांजरेकर यांचा बिग बॉस मराठीसाठीचा करार संपुष्टात आला आहे. तर, महेश मांजरेकर यांना पाचव्या सीझनचे होस्टिंग करण्याची इच्छा होती. पण, इतर कामांमुळे त्यांना करार करता आला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कलर्स मराठीने यंदाच्या सीझनसाठी होस्ट म्हणून रितेश देशमुखसोबत संपर्क साधला आणि महाराष्ट्राच्या दादाची या शो मध्ये एन्ट्री झाली. 

पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज 

'बिग बॅास'चे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये 'बिग बॅास'च्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget