Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंत याचा आज 7 ऑक्टोबर रोजी 43 वा वाढदिवस आहे. अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीझन 8 चा उपविजेता ठरला आहे. 'इंडियन आयडॉल 1' चा पहिला गायक अभिजीत सावंत शो जिंकल्यानंतर बरेच दिवस प्रसिद्धीपासून दूर होता. यानंतर तो बिग बॉसमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकला. अभिजीत सावंतला प्रेक्षकांचा भरभरुन पाठिंबा मिळाल्याचा पाहायला मिळालं. अभिजीतचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार खडतर आहे. अभिजीत सावंतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबाबत जाणून घ्या.
पत्र्याच्या शेडमध्ये राहिला, 'इंडियन आयडॉल'नं नशीब चमकलं
'इंडियन आयडॉल 1' चा पहिला विजेता-गायक अभिजीत सावंत बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्धीपासून दूर होता, त्यानंतर त्याने बिग बॉस मराठी सीझन 5 मधून पुन्हा एकदा कमबॅक केलं. मावशीसोबत तिच्या टीन पत्र्याच्या झोपडीत राहण्यापासून ते रिॲलिटी शो जिंकण्यापर्यंतचा अभिजीतचा प्रवास फारच संघर्षमय आहे. इंडियन आयडॉल जिंकल्यानंतरही त्याला इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करावा लागला. अभिजीतने एका मुलाखतीत खुलासा केला की, तो पत्र्याच्या झोपडीत राहत होता.
अभिजीत सावंतची इंडस्ट्रीमधील कारकीर्द
अभिजीत सावंतने 2004 मध्ये देशातील पहिला इंडियन आयडॉल शो जिंकला होता. हा शो अमेरिकन रिॲलिटी शोचे भारतीय व्हर्जन होतं. या शोमध्ये अभिजीत सावंतच्या आवाजाच्या जादूने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केलं. पहिला इंडियन आयडॉल शो जिंकल्यानंतर अभिजीत सावंतचा पहिला अल्बम 'आपका अभिजीत सावंत' 2005 साली रिलीज झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनंतर, 2007 मध्ये अभिजीत सावंतचा 'जुनून' हा दुसरा अल्बम प्रदर्शित झाला.
बिग बॉस मराठीचा 'जेंटलमन' अभिजीत सावंत कोट्यवधींचा मालक
दरम्यान, अभिजीत सावंतने अनेक चित्रपटांमध्ये आवाजाची जादू चालवली आहे. आशिक बनाया आपने, तीस मार खान, इश्क वाला लव आणि ढिशूम यांसारख्या चित्रपटांसाठी अभिजीत सावंतने गाणी गायली आहेत. लॉटरी आणि तीस मार खान या चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. पण, त्याला अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवता आली नाही.
अभिजीत सावंतच्या उत्पन्नाचं साधन काय?
अभिजीत सावंतने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या एकूण उत्पन्नाच्या 70 टक्के कमाई गाण्यांमधून होते. लेबल 20 टक्के घेतात आणि उर्वरित 10 टक्के कलाकारांना मिळतात. स्टेज शो आणि लाइव्ह शो हे त्याच्या कमाईचं सर्वात मोठे स्त्रोत आहेत. याशिवाय त्याच्या गाण्यांमधून किंवा आधीच्या अल्बममधून त्याला मिळणारी रॉयल्टी यातूनही काही उत्पन्न मिळतं. मात्र, कॉन्सर्ट आणि लाइव्ह परफॉर्मन्समधून त्याची सर्वाधिक कमाई होते असंही त्याने सांगितलं.
अभिजीत सावंत कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
अलिकडेच अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सामील झाला होता. ज्यामध्ये तो टॉप 2 फायनलिस्टपैकी एक होता. त्याचा हा शो जिंकता आला नसला तरी, तो शोमध्ये 14 आठवडे होता. बिग बॉस शोसाठी अभिजीतने दर आठवड्याला सुमारे 3.5 लाख रुपये फी घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिजीत सावंत सुमारे 1.2 ते 8 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :