Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा अखेर समारोप झाला आहे. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेकडून भरभरून प्रेम मिळाल्याने सूरज चव्हाण यंदाच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. टॉप 3 सदस्यांमध्ये सूरज, अभिजीत आणि निक्की हे सदस्य होते निक्की बाहेर गेल्यावर सूरज आणि अभिजीत यांच्या टक्कर होती. ज्यामध्ये सूरज चव्हाण जिंकला. सूरज चव्हाण विजेता तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला. उपविजेत्या अभिजीत सावंतला काय बक्षीस मिळालं, ते जाणून घ्या.
सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5 चा विजेता
अखेर 70 दिवसांनंतर बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5 Winner) पाचव्या सीझनचा विजेता मिळाला आहे. सूरज चव्हाण याने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सूरज चव्हाणला बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर 14 लाख रुपये, 10 लाखांचं गिफ्ट व्हाऊचर आणि ईव्ही बाईक बक्षीस म्हणून मिळाली आहे. यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, उपविजेत्या अभिजीत सावंतला काय मिळालं. अभिजीत सावंतला फक्त एक लाख रुपयांचं गिफ्ट व्हाऊचर मिळालं.
सूरज चव्हाणला 14 लाख, अभिजीत सावंतला काय बक्षीस?
बिग बॉस मराठी पाचव्या सीझनच्या टॉप 2 मध्ये सूरज आणि अभिजीत सावंत होते. सूरजने ट्रॉफी जिंकल्याने त्याला ट्रॉफी, पैसे, गिफ्ट व्हाऊचर आणि बाईक मिळाली. मात्र, अभिजीत सावंतला एक लाख रुपयांच्या गिफ्ट व्हाऊचरवर समाधान मानावं लागलं. याशिवाय फर्स्ट रनर अप निक्कीलाही एक लाख रुपयांचं गिफ्ट व्हाऊचर मिळालं. त्याआधी ग्रँड फिनालेमध्ये सहा फायनलिस्ट असताना बिग बॉसने सदस्यांना 9 लाखांची रक्कम घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा पर्याय दिला होता. त्यावेळी जान्हवी किल्लेकरने संधी साधली आणि पैसे घेऊन शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
उपविजेत्या अभिजीत सावंतला काय मिळालं?
दरम्यान, ग्रँड फिनालेमध्ये विजेता सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांना बक्षीसाची रक्कम मिळाली. यासोबतच त्यांना आणि घरातील इतर सदस्यांना त्यांची आठड्याप्रमाणे ठरलेल्या मानधनाची रक्कम मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरज चव्हाणला दर आठवड्याला 25 हजार, अभिजीत सावंतला 3.50 लाख रुपये आणि निक्की तांबोळीला सर्वाधिक 3.45 लाख रुपये याप्रमाणे 14 आठवड्यांचं मानधन मिळेल. याचप्रमाणे इतर सदस्यांनाही त्यांची ठरलेली फी मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :