Happy Birthday Abhijeet Sawant : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अखेर संपला आहे. सूरज यंदाच्या पर्वाचा विजेता, तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले झाल्यानंतर अभिजीत सावंतच्या घरी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याशिवाय, त्याच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशनही पार पडलं आहे. अभिजीत सावंतचा आज 7 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिजीतने त्याचा वाढदिवस कुटुंब आणि मित्रमंडळीसोबत साजरा केला.

ग्रँड फिनालेनंतर अभिजीत सावंतच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

अभिजीत सावंतने कुटुंबासोबतच्या त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. अभिजीतने इंस्टाग्रामवर बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलंय की, 'ज्यांनी ज्यांनी मला व्होट केलं, ज्यांनी बिग बॉस मराठी हा शो बघितला, त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज माझा वाढदिवस असून मी तो माझं कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत साजरा करतोय'.

अभिजीत सावंतचं बर्थडे सेलिब्रेशन

 

अभिजीत सावंतवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, "हॅप्पी बर्थडे विनर". एकाने लिहिलंय, "दादा आमच्यासाठी तूच विनर आहे". दुसऱ्याने लिहिलेय, "जे होतं चांगल्यासाठी होतं, देव तुझं भलं करो". आणखी एकाने लिहिलंय, "तू एक चांगला गायक असण्यासोबतच एक चांगला माणूस आहेस. लोकांनी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही तू त्यांचा निरादर केला नाही. तू खरा हिरो आहे. हार कर जितनेवाले को बाजीगर कहते हैं."

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर अभिजीतचं घरी जंगी स्वागत

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणच्या विजयानंतर प्रेक्षकांकडून पॅडीला कौतुकाची थाप; 'पॅडी दादा हे तुमच्यामुळे शक्य झालं', प्रेक्षकांनी मानले आभार