Bigg Boss Marathi 4 : मराठी बिग बॉस सीझन 4 (Bigg Boss Marathi 4) अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. येत्या 8 जानेवारीला बिग बॉस सीझन 4 चा फिनाले आहे. हा सीझन जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धकामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. सध्या घरात टॉप 5 स्पर्धक आहेत. आणि घरातलं वातावरण अधिक मनोरंजक करण्यासाठी बिग बॉसच्या घरात पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळतेय. आज घरात प्रसिद्ध RJ ची एन्ट्री झाली आहे. 

Continues below advertisement


येत्या 8 जानेवारीला बिग बॉस मराठी सीझन 4 चा फिनाले होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर फिनाले आहे. त्या निमित्ताने घरातील टॉप 5 सदस्यांचं दडपण कमी करण्यासाठी तसेच घरात मौज, मजा करण्यासाटी रोज नवीन पाहुणे येत आहेत. बिग बॉसच्या आजच्या भागात RJ रुद्रा आणि RJ निधी येणार आहेत. त्यामुळे आज घरात चांगलीच मजा, मस्ती आणि धम्माल होणार आहे. 


पाहा व्हिडीओ : 






'या' टॉप 5 सदस्यांची फिनालेत एन्ट्री 


गेल्या आठवड्याच्या चावडीवर प्रसाद जवादेची घरातून एक्झिट झाली होती. तसेच, बिग बॉसच्या घरात काल मिड नाईट एव्हिक्शन (Mid Night Eviction) झालं आहे. यामध्ये आरोह वेलणकर बिग बॉसच्या स्पर्धेतून बाद झाला. त्यामुळे घरात आता अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत या टॉप सदस्यांची फिनालेमध्ये एन्ट्री झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या घरात शिव ठाकरे 'या' स्पर्धकाच्या प्रेमात पडला; चाहते म्हणाले,"हेच बघायचं बाकी होतं"