Bigg Boss 16 : सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 16'ची (Bigg Boss 16) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता हा वादग्रस्त कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दु रोजिकने (Abdu Rozik) नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

Continues below advertisement


'बिग बॉस 16'च्या आगामी भागाचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये शिव ठाकरे आणि अब्दुचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये शिव अब्दुला छेडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर अब्दू लाजतो आणि शिवला थप्पड मारतो.






शिव ठाकरे आणि अब्दुचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शिव ठाकरे आणि अब्दूने त्यांच्या रोमॅंटिक अंदाजात चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. या व्हिडीओवर शिव ठाकरे अब्दूच्या प्रेमात पडला, हेच बघायचं बाकी होतं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


बिग बॉसने या आठवड्यात स्टेन, प्रियांका, निमरित आणि अब्दुला कॅप्टन होण्याची संधी दिली होती. या टास्कचा साजिद संचालक होता. या टास्कदरम्यान अब्दूने बाजी मारली असून तो आठवड्याचा कॅप्टन झाला आहे. 


शिव ठाकरे होणार विजेता? 


शिव ठाकरे हा 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. सध्या तो सलमान खानचा हिंदी 'बिग बॉस' गाजवत आहे. शिव ठाकरे 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) चा विजेता व्हावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. त्याची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 


संबंधित बातम्या


Abdu Rozik Fees : 'बिग बॉस'च्या शोसाठी अब्दु रोजिकला मिळालं 'इतकं' मानधन; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल