Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Marathi 4) चा ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच प्रत्येक स्पर्धकात फिनालेची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरात जेव्हापासून राखी सावंत आलीय तेव्हापासून घराचं स्वरूपच बदललंय. कधी मज्जा मस्ती तर कधी आऊट ऑफ कंट्रोल होऊन अनेक हरकती करणं ही राखीच्या खेळाची स्ट्रॅटेजी आहे. असाच एक वाद घरात पुन्हा निर्माण झाला आहे. या वादात राखीचा राग पुन्हा अनावर झाला आहे. 


बिग बॉसच्या घरात आता अवघे सात स्पर्धक बाकी आहेत. अनेकदा या स्पर्धकांमध्ये प्रेम, जिव्हाळा, मैत्री पाहायला मिळते तर कधी एकमेकांच्या कट्टर विरोधात उभे राहणारे मित्र पाहायला मिळतात. एकंदरीतच या शो ची रंगत वाढत चालली आहे. आता घरातील स्पर्धक अमृता धोंगडेने राखी सावंतबरोबर पंगा घेतला आहे. राखी अंघोळीला गेली असताना अमृताने बाथरूमचे दार बंद केले आहे. यावर राखीचा प्रचंड संताप होतो. पुढे राखी असे काही कृत्य करते ज्यामुळे घरातील प्रत्येकजण तिच्यावर चिडतो. 


पाहा व्हिडीओ : 



घरातील 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार 


घरात नुकत्याच झालेल्या नॉमिनेशनमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे तीन सदस्य नॉमिनेशनमध्ये आहेत. यापैकी या आठवड्यात कोणता सदस्य फिनालेला मुकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. सध्या अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर आणि आरोह वेलणकर या स्पर्धकांनी फिनालेमध्ये एन्ट्री केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Dharmaveer 2 : धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार? मंगेश देसाईंनी केली 'धर्मवीर 2'ची घोषणा