एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसमधून शिवलीला पाटील बाहेर पडली, काय आहे कारण?

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरातून शिवलीला पडली बाहेर, प्रकृती खालावल्याने घेतला निर्णय

Bigg Boss Marathi 3 : गेले दोन दिवस विकेन्डचा डाव चांगलाच रंगला होता. घरातील स्पर्धकांना महेश मांजरेकरांनी चांगलेच सुनावले. आता मांजरेकरांनी केलेल्या सुचनांचे पालन स्पर्धक किती करणार हे येणारा आठवडाच ठरवणार आहे. शिवलीला पाटीलची प्रकृती खालावल्यामुळे तिने बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्पर्धकांना कळताच घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.  विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रू अनावर झाले होते. तिने घेतलेल्या या निर्णयानंतर आज विशाल आणि घरातील इतर सदस्य त्यांची मते मांडताना दिसणार आहेत. 

शिवलीलाच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भाऊक झाला होता. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना  दिसणार आहे. विशाल म्हणाला,"ती असायला हवी होती, खूप शिकवून गेली. तिने दिलेला विश्वास आपल्याला कधीच मोडता येणार नाही. काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करुन जातात, त्यातली ती आहे". मीनल म्हणाली, "ती कशी होती आपल्याला माहिती आहे. तिच्यासारखी मुलगी मी कधीच बघितली नाही. तिच्यासमोर असलेल्या ज्ञानापुढे आपण कोणीच काही नाही आहोत". 

दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली, काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले तर काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे देखील दाखवून दिले. वूटद्वारे जय आणि विशालसाठी अतरंगी डिमांड आले होते. त्यात जयने बाजी मारली. त्यासोबत "चुगली बूथ"मध्ये जयच्या फॅनने त्याला चुगली केली. त्यात विकास आणि विशाल काय म्हणाले ते उघड केले. काल बिग बॉसच्या घरात "एकच फाईट वातावरण टाईट" हा टास्क पार पडला. यात स्पर्धकांनी बॉक्सिंग क्लोज घातले होते. त्यांच्या समोर घरातील सदस्यांचे फोटो होते. त्यातील त्यांना हव्या असलेल्या सदस्याचा फोटो घेऊन त्याला बॉक्सिंगचे पंच द्यायचे होते. 

आज कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरात फोन वाजताना दिसून येत आहे. त्यात बिग बॉस स्पर्धकांना म्हणत आहेत. बिग बॉस आपणा सर्वांना आपले फोन परत देत आहेत. त्यानंतर घरातील सर्व सदस्य प्रचंड खूश दिसून येत आहेत. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कोण कोणाला भिडणार? कोणते टास्क रंगणार? कोण बाजी मारणार? कोणाच्या हाती हार येणार? कोणाला मिळणार कॅप्टन बनण्याचा बहुमान मिळणार याकडे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
Embed widget