Bigg Boss Season 18 : बिग बॉस 18 चा यंदाचा सीझन धमाकेदार असल्याचं पहिल्या आठवड्यापासूनच पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात फुल ऑन इंटरटेन्मेंट पाहायला मिळत आहे. बिग बॉस 18 मध्ये सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. या शोमध्ये रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गुरुवारी नॉमिनेशन टास्क झाल्यानंतरही घरात बराच गदारोळ झाला आणि घरातील सदस्यांनी एकमेकांवर वर्चस्व गाजवले.
जेलची शिक्षा होताच सदावर्ते संतापले
बिग बॉसने घरातील सर्व सदस्य एकत्र बोलावलं. यानंतर तुरुंगातील लोकांनी बाहेर यावे की नाही, असा सवाल बिग बॉसने केला. यावेळी बिग बॉसने सांगितलं की, तुरुंग कधीही रिकामे राहू शकत नाही. यानंतर बिग बॉसने सांगितलं की, ईशा, अविनाश आणि करणवीर यांना तुरुंगाच्या शिक्षेसाठी एका सदस्याची निवड करावी लागेल. तिघांनीही गुणरत्न सदावर्तेंचं नाव शिक्षेसाठी निवडलं.
गुणरत्न सदावर्तेंचं उपोषण
ईशा, अविनाश आणि करणवीर ठरवतात की, त्यांना गुणरत्न सदावर्तेंना तुरुंगात पाठवायचं आहे. मात्र, जेलची शिक्षा होताच सदावर्ते संतापले, त्यांनी या शिक्षेचा विरोध करत तुरुंगाची शिक्षा स्वीकारण्यास नकार दिला. चाहतला स्वतःच्या इच्छेने तुरुंगात गेली, पण सदावर्तें तुरुंगात जाणार नाही या निर्णयावर ठाम होते. कुटुंबीय त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलं आणि जेलमध्ये जाण्यास नकार दिला. सदावर्तेंनी जेलची शिक्षा स्वीकारण्यास नकार दिल्याने बिग बॉसने तुरुंगातील हेमा आणि बग्गा यांची शिक्षा पुढील आदेशापर्यंत कायम ठेवली, यामुळे व्हायरल भाभी हेमा शर्माला रडू कोसळलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :