Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस सीझन 18 ला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील राड्यामुळे बिग बॉस प्रेमींचं चांगलं मनोरंजन होताना दिसत आहे. बिग बॉस 18 च्या घरातील सदस्यांन दररोज नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्यासोबत सदस्यांचे एकमेकांसोबत वाद होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणावरुन सुरु होणाऱ्या वादामुळे सदस्यांसोबत जोरदार खटके उडताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात अविनाश मिश्राचं दररोज कोणत्या न कोणत्या सदस्यांबरोबर भांडण होताना दिसत आहे. सध्या अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा याचं भांडण चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
आधी कडाक्याचं भांडण, मग एका KISS नं सुटलं समीकरण?
अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांचं भांडण चर्चेत असताना त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा हे दोघे लिपलॉक करताना दिसत आहे. करणवीर आणि अविनाश मिश्रा किस करतानाचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
अविनाश अन् करणवीर लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल
ट्विटरवर सध्या एक क्लिप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिग बॉस रोस्टर नावाच्या पेजने एक्स मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये करणवीर आणि अविनाश एकमेकांच्या जवळ येऊन लिप-लॉक करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. हे दोन्ही स्टार्स अचानक लिपलॉक का करतायत आणि या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय, ते जाणून घ्या.
किस करतानाचा व्हिडीओ AI जनरेटेड
करणवीर मेहरा आणि अविनाश मेहरा यांचा किस करतानाचा व्हिडीओ फेक आहे. हा बनावट व्हिडीओ असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा लिपलॉकचा व्हिडीओ मॉर्फ्ड आहे. हा व्हिडीओ AI जनरेटेड आहे. AI म्हणजेच आर्टिफिशल इंटिलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर करत हा लिपलॉक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्यानंतर मॉर्फ्ड करकत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, ज्यामुळे तो व्हायरल झाला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :