Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात सध्या भांडण तंटा आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात 17 व्या एपिसोडमध्ये पाच जणांचे नॉमिनेशन झाले. यावेळी छेडछाडीच्या आरोपावरून रजत आणि शहजादा भिडल्याचे दिसून आले. एकमेकांची औकात काय? असं म्हणत त्यांनी एकमेकांवर चिखलफेक केल्याचे दिसून आले. यावेळी घरच्यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तरीही ते कोणालाही बधले नाहीत. शेवटी घरच्यांनी दोघांनाही बाजूला नेत समजावल्याचे दिसले. त्यांचे भांडण संपते ना संपते तोच अविनाश आणि श्रुतिकाचे भांडण सुरू झाले. 

नक्की झाले काय?

नॉमिनेशनसाठी नाव देत सर्व स्पर्धक बाहेर येत असताना रजतने त्याच्यावर झालेल्या छेडछाडीच्या आरोपावर घरातील महिला सदस्यांकडून उत्तर मागितले.  यावेळी तो प्रचंड संतापलेला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शहाजादा त्याला बोलला. त्याच्या बोलण्याने दोघेही संतापत एकमेकांच्या अंगावर धावले. तू गुंड आहेस.. मी बाहेर कोण आहे हे तुला माहीत नाही.. एक फोन येईल आणि तुला माफी मागावी लागेल असं शहजादा रजतला म्हणाला. 

छेडछाडीच्या आरोपावरून रजत शहाजादा यांच्यात वादावादी

मी तुझ्यावर छेडछाडीचा आरोप केला नाही तू माझं नाव कोणासोबत जोडशील का असे म्हणत शहाजादा त्याने रजतशी जोरदार भांडण केल्याचे दिसले. त्यांचे भांडण संपते न संपते तोच श्रुतीका आणि अविनाश एकमेकांशी हुज्जत घालू लागले.

 

पाच सदस्य नॉमिनेट 

आज बिग बॉस 18 च्या एपिसोड मध्ये श्रुतिका आणि अविनाश मिश्रा यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला. वास्तविक बिग बॉस ने नॉमिनेशन चे नियंत्रण श्रुतिकाच्या हातात दिले आहे. अविनाश नायरा रजत मुस्कान आणि विवियन या पाच जणांना या आठवड्यात नॉमिनेशन मिळाले आहे.

 हेही वाचा:

Bigg Boss 18: अरफीनच्या एका चुकीने सारा घराबाहेर? ऑडिओ क्लिप ऐकवत बिग बॉस म्हणाले, येत्या 24 तासांत..