Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी  Munawar Faruqui) हा विजेता ठरला आहे. मुनव्वर  फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नार चोप्रा (mannara chopra) हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सलमान खाननं (Salman Khan) मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.


आज बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. मुनव्वर हा बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा महाविजेता ठरला आहे. मुनव्वरचा आज वाढदिवस आहे. मुनव्वरसाठी त्याचा हा वाढदिवस खास ठरला आहे, कारण त्याला बिग बॉस-17 ची ट्रॉफी मिळाली आहे.


जाणून घ्या मुनव्वरबद्दल (Who is Munawar Faruqui)


मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो. मुनव्वर त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अनेक वेळा मुनव्वर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये केलेल्या विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.  






'लॉक-अप' या शोमुळे मुनव्वरला मिळाली लोकप्रियता 


लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक,  गाडी हे मिळाले. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे.


मुनव्वरनं लॉकअप या शोमध्ये सांगितलं होतं की त्याच्या आईचा मृत्यू अॅसिड प्यायल्यानं झाला होता. तो म्हणाला होता,  'जानेवारी 2007 मध्ये ही घटना घडली. माझ्या आजींनं मला सांगितलं होतं की माझ्या आईची तब्येत ठिक नाहिये. पोटादुखीमुळे मी माझ्या आईला ओरडताना पाहिलं होतं. मी माझ्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तेव्हा कळालं की, माझ्या आईनं अॅसिड प्यायलं होतं. तेव्हा मी तिचा हात पकडला होता. डॉक्टर मला म्हणाले की त्यांचा हात सोडून दे कारण त्यांचे निधन झाले आहे.  पोस्टमॉर्टम झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, माझ्या आईनं सात ते आठ दिवस जेवण देखील केले नव्हते. '


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात मुलाची आठवण आल्यानंतर मुनव्वर फारुकी झाला भावूक; पाहा व्हिडीओ