Nick Jonas: अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) पती आणि गायक निक जोनास (Nick Jonas) हा सध्या त्याच्या भावासोबत मुंबईत आला आहे. निक जोनासनं काल (शनिवार) Lollapalooza मुंबई (Mumbai) कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले. भारतीय चाहत्यांनी निक आणि त्याच्या भावांचे जोरदार स्वागत केले. या कॉन्सर्टमध्ये अनेकजण निकला 'जीजू-जीजू' म्हणताना दिसले. नुकताच कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक निक जोनासला स्टेजवर पाहिल्यानंतर 'जीजू-जीजू' ओरडताना दिसत आहेत. 


प्रेक्षक निक पाहिल्यानंतर ओरडायला लागले 'जीजू-जीजू'


जोनास ब्रदर्स म्हणजेच निक, जो आणि केविन जोनास यांनी कॉन्सर्टच्या पहिल्या दिवशी त्यांच्या हिट गाणी परफॉर्म केली. तर केविनने निकला प्रेक्षकांसमोर 'जीजू' म्हणून इंट्रोड्युस केलं. ज्यामुळे भारतीय चाहत्यांनी 'जीजू-जीजू' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. 


निकनं दिली अशी रिअॅक्शन


प्रेक्षकांनी 'जीजू-जीजू' म्हणायला सुरुवात केल्यानंतर निक जोनास म्हणाला, "मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो, धन्यवाद." निक जोनासने कॉन्सर्टमध्ये भारतीय प्रेक्षकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही . त्याने स्टेजवर किंगसोबत 'मान मेरी जान एक्स आफ्टरलाइफ' हे गाणं सादर केला. या गाण्याचा काही भाग निकनं हिंदीत गायला. प्रियांका आणि रणवीर सिंह स्टारर दिल धडकने दो या चित्रपटातील एक ट्रॅक देखील कॉन्सर्टमध्ये वाजवण्यात आला.


पाहा व्हिडीओ:






तापसी पन्नूनं शेअर केला व्हिडीओ



अभिनेत्री तापसी पन्नूनेही या कॉन्सर्ट हजेरी लावली. निकच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तापसीनं शेअर केला. तिने त्याला कॅप्शन दिले, “जिजाजी स्टेज पे हैं"


कॉन्सर्टनंतर जोनास ब्रदर्स नताशा पूनावालाच्या पार्टीत दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


प्रियांकानं निक जोनाससोबत 2018 मध्ये लग्न केलं. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये आई-वडील झाले. प्रियांकानं तिच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं. प्रियांका आणि निक हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Priyanka Chopra and Nick Jonas : प्रियांका चोप्राचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज, पती निक जोनस सोबत शेअर केले फोटो