Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


'बिग बॉस 17' सुरू होण्याआधापासूनच चर्चेत आहे. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन आठवड्यात या पर्वाचा विजेता कोण असेल हे समोर येईल. भांडण, प्रेम, मैत्री अशा सर्व गोष्टींमुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. 'बिग बॉस 17'चा विजेता होण्यासाठी प्रत्येक स्पर्धक खूप मेहनत घेत आहे.


'बिग बॉस 17' या कार्यक्रमाची कोण विजेता होणार? याबद्दल अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. या कार्यक्रमासंदर्भात नवनवे अपडेट समोर येत आहेत. नुकताच पार पडलेला 'वीकेंडचा वार' करण जोहरने (Karan Johar) होस्ट केला होता. दरम्यान करणने स्पर्धकांची शाळा घेतली. 




'बिग बॉस 17'च्या विजेत्याला काय बक्षीस मिळणार?


'बिग बॉस 17'च्या विजेत्याला ट्रॉफी, आलिशान कार आणि 50 लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी घरातील सर्व स्पर्धकांमध्ये चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. 


'या' स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस


'बिग बॉस 17' या कार्यक्रमात एकूण 17 स्पर्धक सहाभागी झाले होते. यातील सोनिया, मानसवी, जिग्ना वोरा, सनी आर्य, खानजादी, सना रईस खान आणि नाविद सोले या स्पर्धकांचा प्रवास संपला. आता अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, औरा, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, मनारा चोप्रा, अनुराग डोभाल, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, अभिषेक कुमार, रिंकू धवन आणि अरुण माशेट्टी या स्पर्धकांमध्ये चुरस रंगणार आहे. 28 जानेवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. आपला आवडता स्पर्धक जिंकावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे आणि मुनव्वर फारुकी या स्पर्धकांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सासूवर भडकली राखी सावंत; म्हणाली,"कैकेयी बनू नका, शांत राहा"