Rinku Dhawan: 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाला सुरूवात झाला आहे. काल (15 ऑक्टोबर) या कार्यक्रमाचा प्रिमियर पार पडला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू धवन हिने (Rinku Dhawan) या शोमध्ये एन्ट्री केली आहे. जाणून घेऊयात रिंकू धवनबद्दल...
'कहानी घर घर की' मुळे मिळाली लोकप्रियता
सलमान खानच्या 'बिग बॉस 17' या लोकप्रिय शोमध्ये टीव्ही अभिनेत्री रिंकू धवननं एन्ट्री केली आहे. रिंकू धवन ही टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कहानी घर घर की' (Kahani Ghar Ghar Ki) या कार्यक्रमामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. रिंकूनं या कार्यक्रामध्ये छाया अग्रवाल ही भूमिका साकारली. रिंकूनं ये वादा रहा, गुप्ता ब्रदर्स, ना बोले तुम ना मैं कुछ कहा, तितली या शोमध्ये देखील काम केले.
किरण करमरकरसोबत बांधली होती लग्नगाठ
रिंकू ही 'कहानी घर घर की' (Kahani Ghar Ghar Ki) या मालिकेतील तिचा सहकलाकार किरण करमरकरच्या (Kiran Karmarkar) प्रेमात पडली. रिंकू ही 'कहानी घर घर की' या मालिकेत किरणच्या बहिणीची भूमिका साकारत होती. पण नंतर किरण आणि रिंकू यांनी रिअल लाईफ कपल होण्याचा निर्णय घेतला. रिंकू आणि किरण यांनी 2002 मध्ये लग्न केले. लग्नानंतर जवळपास 15 वर्षानंतर रिंकू आणि किरण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रिंकू आणि किरण यांना एक मुलगा आहे.
नुकताच बिग बॉस या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत रिंकू धवन दिसत आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, "है वो एक एनर्जी का पिटारा, क्या यह दिल, दिमाग और दम के नये दौर में छक्का मार पायेगी रिंकू?" बिग बॉस- 17 या शोमध्ये रिंकूचा गेम प्लॅन कसा असेल? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
पाहा प्रोमो:
इतर महत्वाच्या बातम्या:
Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...