Naved Soul : सलमानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 16'मध्ये (Bigg Boss 16) झळकलेला ताजिकिस्तानचा अब्दू रोजिक (Abdu Rozik) तुम्हाला आठवतोय का? 'बिग बॉस'मध्ये अब्दूची एन्ट्री झाली आणि मूर्ती लहान पण किर्ती महान असणाऱ्या या अब्दूने प्रेक्षकांना वेड लावलं. आता यंदीही एक विदेशी पाहुणा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'बिग बॉस 17'मध्ये नावेद सोलची (Naved Soul) या विदेशी पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. नावेदला पाहुण भाईजानलाही अब्दूची आठवण झाली आहे. 


नावेद हा लंडनचा रहिवासी असून तो अर्धा पर्शयन आणि अर्धा इटालियन आहे. त्याचा जन्म रोम येथे झाला आहे. नावेदची 'बिग बॉस'च्या मंचावर एन्ट्री होताच सलमानला अब्दू रोजिकची आठवण आली. नावेदमध्ये त्याला अब्दूची झलक पाहायला मिळाली. अब्दूची ओळख करुन देताना भाईजान म्हणाला,"अरे हा तर मोठा अब्दू वाटतोय".






कोण आहे नावेद सोल? (Who Is Naved Soul)


नावेद सोल हा 29 वर्षांचा असून लंडन येथील महाविद्यालयातून त्याने फार्मसीमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. नावेद हा लोकप्रिय कलाकार आहे. 'रिच किड्स गो स्किंट','बीबीसी इटिंग विथ माय एक्स सीझन 2','आयटीव्ही जज रिंडर सीझन 7' आणि 'मनोतो' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये नावेदने काम केलं आहे. 


नावेद सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून अनेक मजेशीर व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नावेदचे इंस्टाग्रामवर 91.5 हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. नावेदला हिंदी भाषा येत नाही आणि बिग बॉसच्या घरात इंग्रजी भाषेतून संवाद साधायला परवानगी नाही. त्यामुळे आता तो 'बिग बॉस'चा खेळ कसा खेळणार हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसप्रेमी उत्सुक आहेत. 


नावेद सोलने कोरोना लसीवरुन केलेलं 'ते' ट्वीट चर्चेत!


नावेद सोल एका ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कोरोना लसीविरोधात त्याने ट्वीट केलं होतं. कोरोनाकाळात लसीवरुन लोकांची दिशाभूल करण्यात येत असल्याची माहिती त्याने पसरवली होती. या ट्वीटमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यानंतर त्याला हे ट्वीट हटवावे लागले.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...