Jigna Vora : 'स्कूप' (Scoop) ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि क्राइम रिपोर्टस जिग्ना वोरा (Jigna Vora) पुन्हा एकदा चर्चेत आली. 'स्कूप' ही सीरिज चांगलीच गाजली होती. जिग्ना वोरा यांच्या 'बिहाइंड बार्स इन भायखळा; मेड इन प्रीजन' (Behind Bars in Byculla: My Days in Prison) या पुस्तकावर आधारित ही सीरिज हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी बनवली होती. अशातच आता पत्रकार जिग्ना वोरा यांची 'बिग बॉस 17'मध्ये (Bigg Boss 17) एन्ट्री झाली आहे. 


भायखळा जेल ते बिग बॉसचं घर हा प्रवास क्राइम रिपोर्टर जिग्ना वोरा यांच्यासाठी खूपच खडतर होता. जिग्ना यांनी बिग बॉसमध्ये जावं अशी त्यांच्या मुलाची इच्छा होती. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना जिग्ना म्हणाल्या,"मी बिग बॉसमध्ये सहभागी व्हावं अशी माझ्या 23 वर्षांच्या लेकाची इच्छा होती. लेकाच्या आग्रहामुळेच मी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेऊ शकले. माझ्यासोबत घडलेली घटना संपूर्ण जगाला कळावी, अशी त्याची इच्छा आहे".  






जिग्ना पुढे म्हणाल्या,"बिग बॉस'च्या माध्यमातून मला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. हा मंच माझ्यासाठी मोठं पाऊल आहे. मी जशी आहे तशीच या घरातही राहणार आहे. मला दु:ख कुरवाळण्यापेक्षा लढायला आवडतं. त्यामुळे मी कशी बिचारी आहे असं मला कोणीही वागवू नये. आयुष्यात आता मी खूप पुढे आले आहे. एक सशस्त स्त्री आता लोकांना दिसेल". 


'या' कारणाने जिग्ना वोरा आल्या चर्चेत!


जिग्ना वोरा यांनी मुंबई मिरर, फ्री प्रेस जर्नल आणि मिड डे अशा अनेक वृत्तपत्रांसाठी क्राइम रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. जिग्नाला अनेक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मिड डेचे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येतील दोन प्रमुख संशयितांपैकी ती एक होती. प्राथमिक तपासानंतर मुंबई पोलिसांनी राजन आणि जिग्ना वोरा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यामुळे नऊ महिने त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं. 


जिग्ना सहा वर्षे भायखळा तुरुंगात होत्या. त्यानंतर त्यांनी यासंपूर्ण अनुभवावर भाष्य करणारं 'बिहाइंड बार्स इन भायखळा; मेड इन प्रीजन' (Behind Bars in Byculla: My Days in Prison) हे पुस्तक लिहिलं. 2019 मध्ये हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं. खडतर प्रवासाचा सामना केलेल्या जिग्ना आता 'बिग बॉस'चं घर गाजवायला सज्ज आहेत. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...