Big Boss 16 : बिग बॉसच्या (Big Boss) प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझनसुद्धा तितकाच दमदार आणि ड्रामाने भरलेला आहे. बिग बॉस 16 (Big Boss 16) मध्ये देखील अशाच काही ड्रामेबाज गोष्टी पाहायला मिळतायत. नुकताच शोचा एक नवीन प्रोमो दाखविण्यात आले आहे. या प्रोमोमध्ये शालिन भानोतला (Shalin Bhanot) बिग बॉसने चांगलेच सुनावले आहे. वास्तविक, शालीनने बिग बॉसकडून चिकन पाठवण्याची मागणी केली. यावर बिग बॉसने शालिनला कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि सांगितले की, चिकन योग्य प्रमाणात खाण्यासाठी घरी पाठवले गेले आहे आणि यापुढे चिकन पाठवले जाणार नाही. यावर शालीन रागावून तेथून निघून जातो.


पाहा व्हिडीओ :






दुसरीकडे, शालीनची ही मागणी ऐकून अर्चना गौतम भडकते आणि शालीनला म्हणते की, "तू टीव्ही सीरियल्स कर. इथे का आलास?" बिग बॉसमध्ये अशा लोकांची गरज नाही. बिग बॉसमध्ये आलेल्यांना फक्त जेवायला घरी पाठवा." त्याचवेळी टीना दत्ता शालीनला शांत राहण्याचा सल्ला देते.


बिग बॉस 16 शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की गौतम विग (Gautam Vig) आणि सौंदर्या शर्मा (Saundarya Sharma) यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. कोर्टच्या कचेरीत दोघांनाही उभं करण्यात आलं होतं. गौतम आणि सौंदर्याचं नातं खोटं आहे असा आरोप घरातील सदस्यांनी या दोघांवर केला. तेव्हा या दोघांनी आपल्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिले.  त्याचवेळी, या आरोपांवर, सौंदर्या म्हणते की, गौतम आणि त्यांच्यामध्ये काय आहे आणि काय नाही हे तिला कोणालाही सांगण्याची गरज नाही. 


महत्वाच्या बातम्या : 


Big Boss 16 : बिग बॉस 16 च्या कोर्टात गौतम आणि सौंदर्याच्या नात्यावर आरोप; तर टीना-शालीनच्या प्रेमावरही उठले प्रश्न