Bigg Boss 15 New Promo : 'बिग बॉस 15' प्रोमोत एका टास्कदरम्यान करण कुंद्रा (Karan Kundra) आणि प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) मध्ये वाद होताना दिसत आहे. जय भानुशाली मोठ्या खुर्चीवर बसून म्हणतो आहे,"आता आला उंट डोंगराखाली". दरम्यान प्रतीक भानुशाली येतो आणि त्याच्या टबमधून कापूस फेकून देतो. तसेच प्रतीक म्हणतो, फसवणूक करण्यास परवानगी नाही".

Continues below advertisement

करण कुंद्रा नंतर कापसाने भरलेला टब रागात फेकून देतो. दरम्यान जय भानुशाली, उमर रियाज आणि प्रतीक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. प्रतीक आणि करण कुंद्राचे जोरदार भांडण होते. टास्कनंतर तेजस्वीदेखील प्रतीकसोबत बोलण्याचा प्रयत्न करते. पण प्रतीक तिलादेखील ओरडतो. दरम्यान विशाल अनोख्या पद्धतीने खेळताना दिसत आहे. विशालचे म्हणनं आहे,"करण कुंद्रा आणि तेजस्वी पैकी एकाने टास्क सोडावा".

करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल आणि तेजस्वीमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. प्रतीक आणि करणमध्ये मारामारी होणार तेवढ्यात तेजस्वी त्यांना थांबवते. विशाल आणि उमर रियाज निशांतसोबत वाईट वागताना दिसणार आहे. येणारे बिग बॉसच्या भाग अधिक रंगतदार होणार आहेत. सदस्यांना अधिक खडतर टास्कचा सामना करावा लागणार आहे.  

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 3 : 'डॅडीचा जावई' पुन्हा बिग बॉसमध्ये? अक्षय वाघमारेच्या इंस्टापोस्टमुळे चाहत्यांमध्ये आनंदीआनंद

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, नाना पाटेकर, संजय राऊतांसह 'या' दिग्गजांचा गौरव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha