Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस फेम अक्षय वाघमारेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. त्या पोस्टमुळे अक्षय पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


अक्षयने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे,"वाईल्ड कार्डद्वारे सहभागी झालेले दोन्ही सदस्य दोन आठवड्यात घराबाहेर पडले आहेत. नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री पेक्षा घराबाहेर पडलेल्या सदस्यांना पुन्हा बिग बॉसच्या घरात जायची संधी मिळाली तर..काय वाटतं तुम्हाला?" अक्षयच्या या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अक्षय परत बिग बॉसच्या घरात गेलास तर एकटा खेळ, आधी होतास त्या ग्रुपमध्ये खेळू नकोस, तुला परत बिग बॉसच्या घरात गेलास तर तुच जिंकणार, असे अक्षयचे चाहते कमेंट्स करत आहेत.





आज बिग बॉसच्या घरात खास पाहुणे येणार आहेत. झिम्मा सिनेमाचे कलाकार आज बिग बॉसच्या घरातील सदस्यांना भेटणार आहेत. प्रोमोमध्ये घरातील सदस्य मजा-मस्ती, डान्स, खेळ खेळताना दिसत आहेत. सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले आजच्या भागात सदस्यांसोबत संवाद साधणार आहेत. बिग बॉसने सोनाली आणि मृण्मयीचे स्वागत करताना सोनाली म्हणाली,"माझं स्वप्नं होतं कधीतरी बिग बॉसने माझं नाव घ्यावं. खरतर मी हा सिनेमा केला, पण लंडनला जाऊन शूट करायला मिळेल, चांगला सिनेमा, पात्र आहे म्हणून नाही तर मला माहिती होतं या सिनेमाचं प्रमोशन बिग बॉसच्या मंचावर होणार आहे".


काल बिग बॉसच्या घरात 'मिशन नॉमिनेशन' टास्क पार पडला. स्नेहा, उत्कर्ष, गायत्री, मीरा, दादूस, सोनाली हे सदस्य या आठवड्याच्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात आज येणार एलिअन


Aayan Khan ड्रग्ज प्रकरणानंतर Shahrukh Khan करणार कमबॅक, शूटिंग सुरू करण्याची केली विनंती


थुकरट वाडीत देशमुख कुटुंबियांनी लावली हजेरी; श्रेया- भाऊ सिड आणि अदितीच्या भूमिकेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha