Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav :  सध्या छोट्या पडद्यावर नवीन मालिका सुरू होत आहेत. या नवीन मालिकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. हाच प्रतिसाद कायम ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. आता,  रंगभूमीवरील सुपरस्टार भरत जाधव (Bharat Jadhav) आता टीव्ही मालिकेत पुनरागमन करत आहे.  झी मराठीवरील  'पारू' (Paru)  या मालिकेत भरत जाधव झळकणार आहे. बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर भरत जाधव टीव्ही मालिकेत भूमिका साकारणार आहे. या मालिकेत भरत जाधव खलनायकी व्यक्तीरेखा साकारत आहे.


'झी मराठी'वर 'पारू' या मालिकेत भरत जाधव दिसणार आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये भरत जाधव दिसला होता. त्यातही त्याच्या सूर्यकांत कदम या व्यक्तीरेखेत खलनायकी राजकारण्याची छटा दिसली होती. मात्र, पहिल्याच एपिसोडनंतर भरत जाधव मालिकेत दिसला नाही. त्यामुळे त्याची भूमिका ही पाहुण्या कलाकाराची भूमिका असेल असे प्रेक्षकांना वाटले होते. 


'पारू'मध्ये खलनायकी भूमिका


'पारू' मालिकेत अभिनेता भरत जाधवची एन्ट्री झाली आहे.  सूर्यकांत कदम ही व्यक्तीरेखा अहिल्यादेवींच्या आयुष्यात उलथापालथ करणार आहे.  सूर्यकांत कदमने अहिल्यादेवीच्या विरोधात आपला पहिला डाव खेळत  श्रीकांतला गायब केले आहे.अहिल्याला आपल्या घरावरील सूर्यकांतचा धोका समजतो. मात्र, सूर्यकांत हा अहिल्यासमोर एक करार ठेवतो. काय आहे तो करार ? अहिल्या समोर हे कोणतं नवं संकट येणार आहे? हे आता मालिकेत उलगडणार आहे.  


भरत जाधवची पारुमध्ये किती मोठी भूमिका असेल याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आले नाही. मालिकेतील कथेचा प्लॉट पाहता ही भूमिका काही एपिसोड पुरती असण्याची शक्यता आहे. भरत जाधव नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 






झी मराठीवर सुरुवातीला 'पारु' आणि 'शिवा' या दोन नव्या मालिका सुरु झाल्या. त्यानंतर 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता पारू मालिकेत नवा ट्वीस्ट आला आहे.