Premachi Goshta Serial Update :  माधवीच्या अपघातामुळे आता सागर मोठ्या संकटात अडकला आहे. तर, मुक्तालाही धक्का बसला आहे. तर, दुसरीकडे सागर आणि मुक्ताविरोधात सावनी आदित्यचा वापर करून फूट पाडण्याचा कट आखत आहे. आता सागर मुक्ताला सगळे सत्य सांगणार का, सावनी पुन्हा मुक्ता आणि सागरमध्ये दुरावा आणणार का? याचे उत्तर आता 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत प्रेक्षकांना मिळणार आहे.


सावनीच्या डोक्यात नवा कट


आदित्यच्या आडून सागर-मुक्ताचा संसार मोडण्याचा डाव ऐकून कार्तिक सावनीवर खूश होतो. आदित्यच्या चुकीमुळे आपल्याला काही गोष्टी दुरुस्त करण्याची संधी मिळाली असल्याचे सावनी सांगते. आता सागरला मुक्ताचा विश्वासघात करण्याशिवाय पर्यायच नाही, असे सावनी सांगते. आता आदित्य माझी तलवार आणि ढाल असल्याचे सावनी कार्तिकला सांगते. 


माधवी मानणार सागरचे आभार


सागर सासू माधवीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जातो. त्यावेळी माधवी सागरचे आभार मानते. त्या दिवशी तुम्ही नसता तर वाचले नसते असेही माधवी सांगते. त्या दिवशी काय घडले हे माधवी आठवते. त्याने धडक दिली आणि ड्रायव्हर थांबला देखील नाही असे माधवी सांगते. माधवी बोलत असताना सागरला आदित्यचे बोलणं आठवतं. सागरला आदित्यची काळजी लागलेली असते. आता, अपघात करणारा आदित्य आहे हे सांगावे की त्याचे नाव सांगू नये या द्विधा मनस्थितीत 


मुक्ताला इंद्रा उलटसुलट बोलणार 


घरी सागर मुक्तासोबत बोलत असताना दुसरीकडे इंद्रा मुक्ताला उलटसुलट बोलत असते. जावयाला तुरुंगात डांबले आणि आता सासूला तुरुंगात टाकणार का, असे इंद्रा मुक्ताला सांगते.  इंद्राच्या बोलण्याने मुक्ता-सागर दुखावतात. मुक्ताच्या बहिणीला याच घरात यायचं आहे. माझं घर मोडू नका. तुझ्यामुळे माझी मुले दुरावली असल्याचा आरोप इंद्रा मुक्तावर करते. लकीला ऑफिसमध्ये प्यून म्हणून ठेवले. त्यामुळे आता मालकाच्या घरात कसे जेवायचे असा विचारतो आणि घरी तो जेवत नाही असे इंद्रा सांगते. मुलगी पण अभ्यासाच्या नावाखाली घराबाहेर असते. सगळी मुले तुझ्यामुळे दुरावली असे इंद्रा मुक्ताला उद्देशून बोलते. कार्तिकने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यानेच आईचा अपघात केला असल्याचे सगळीकडे मुक्ता सांगतेय असे इंद्रा म्हणते. त्यावर सागर मुक्ताच्या बाजूने बोलतो आणि माझ्यामुळे गैरसमज झाला असल्याचे सांगतो. तरीदेखील इंद्राचे समाधान होत नाही. मी माझी बॅग भरून ठेवली असल्याचे सागरला सांगते. तुझ्या नशिबात पत्नीचे सुख नाही आणि माझ्या नशिबात सून सुख नसल्याचे इंद्रा म्हणते. 


आदित्यच्या मनात वेगळी भीती


आदित्य घडलेल्या घटनेने खूपच घाबरलेला आहे. मला तुरुंगात जायचे नाही असे आदित्य सावनीला सांगतो. त्यावर सावनी सागर पप्पा तुला वाचवेल असे सांगते. तू काही चिंता नको करूस असा धीरही सावनी आदित्यला देते.