एक्स्प्लोर
टीव्ही अभिनेता पीयूष सहदेवला जामीन, एका महिन्याने जेलबाहेर
सोनी टीव्हीवरील 'बेहद' या मालिकेत पीयूष समय ही व्यक्तिरेखा साकारत होता.

मुंबई : 'बेहद' या टीव्ही मालिकेतील अभिनेता पीयूष सहदेवला जामीन मिळाला आहे. एका मॉडेलवर बलात्कार केल्याच्या आरोपात मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पीयूष सहदेव सुमारे एक महिन्यानंतर जेलबाहेर आला आहे. जेलबाहेर आल्यानंतर पीयूषने कुटुंबीयांसोबत नव्या वर्षाचं स्वागत केलं. परंतु यावेळी त्याची पत्नी सोबत नव्हती.
सोनी टीव्हीवरील 'बेहद' या मालिकेत पीयूष समय ही व्यक्तिरेखा साकारत होता.
23 वर्षीय मॉडेलने पीयूषवर बलात्काराचा आरोप केला होता. वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 नोव्हेंबरला त्याला अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
पीयूष सहदेव आणि मॉडेलमध्ये सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याने त्याला जामीन मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, पीयूषवर अजूनही तीन-चार आरोप आहेत.
दुसरीकडे जामीन मिळाल्यानंतर पीयूष सहदेवने सोशल मीडियावरही कमबॅक केलं आहे. त्याने त्याचा फेसबुक प्रोफाईल फोटो अपडेट केला आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























