मुंबई : प्रसिद्ध टीव्ही आणि सिने अभिनेत्री अल्का कौशल यांना दोन वर्षांचा तुरुंगवास ठोठवण्यात आला आहे. अल्का कौशल आणि त्यांची आई विश्व मोहन बडोला यांना पैशांची अफरातफर आणि चोरी प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


25 लाख रुपयांचे दोन चेक बाऊन्स झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कौशल आणि त्यांच्या आईने अवतार सिंग नावाच्या एका परिचिताचे 50 लाख रुपये घेतले होते, मात्र ते परत न केल्याचा आरोप आहे. पंजाबच्या संगरुरमधील जिल्हा कोर्टाने दोन वर्षांसाठी मायलेकीची रवानगी तुरुंगात केली आहे.

अल्का कौशल यांनी बजरंगी भाईजान चित्रपटात करिना कपूरच्या आईची व्यक्तिरेखा साकारली होती. क्वीन, धरम संकट मे या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. याशिवाय कुबूल है, स्वरांगिनी, सरोजिनी, कुमकुम यासारख्या मालिकांतही त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

अल्का कौशल यांची आई विश्व मोहन बडोला यांनी काही नाटकांमध्ये काम केलं आहे. अभिनेता वरुण बडोला हा अल्का यांचा भाऊ आहे.