मॉडेल सोनिका सिंहच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता विक्रमला अटक
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2017 10:43 AM (IST)
कोलकाता : प्रो कबड्डीची फेम मॉडेल, अभिनेत्री सोनिका सिंह चौहानच्या मृत्यू प्रकरणी अभिनेता विक्रम चॅटर्जीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या विशेष पथकाने विक्रमला बेड्या ठोकल्या. एप्रिल महिन्यात कार अपघातात सोनिका सिंहचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी कार विक्रम चॅटर्जी कार चालवत होता, तर सोनिका त्याच्या शेजारी बसली होती. बेदरकारपणे गाडी चालवून सोनिकाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा विक्रमवर दाखल करण्यात आला आहे. मेकॅनिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट्सनुसार विक्रम अपघाताच्या वेळी अत्यंत वेगाने कार चालवत होता.