Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमध्ये दया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री  दिशा वकानीच्या (Disha Vakani)  अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण गेल्या पाच वर्षांपासून दिशा ही या मालिकेमध्ये काम करत नाहीये. काही दिवसांपूर्वी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या नव्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये दया ही पुन्हा मालिकेत एन्ट्री घेणार आहे, असं दिसत आहे. पण दयाची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे, हे दिसत नाही. त्यामुळे चाहत्यांना वाटले की दिशा ही या शोमध्ये परतणार आहे. पण आता मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितले आहे की, दया ही भूमिका दिशा साकारणार नाहीये. 


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी  एका मुलाखतीमध्ये  सांगितलं की, दिशा वकानी ही दया ही भूमिका साकारणार नाही. दया या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू आहे. लवकरच एक नवी अभिनेत्री या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. 


असित मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, 'दयाबेन ही भूमिका परत मालिकेत न आणण्याचं आमच्याकडे कोणतही कारण नाही. 2020 आणि 2021 हा अनेकांसाठी कठिण काळ होता. पण आता 2022 मध्ये चांगल्या काळाची सुरूवात झाली आहे. आता लवकरच दया तुमच्या भेटीस येणार आहे. आता प्रेक्षक पुन्हा दया आणि जेठालालची जोडी पाहू शकणार आहेत. पुढे ते म्हणाले होते, ' दिशा वकानी  ही दयाची भूमिका साकारेल की नाही?  हे मी सांगू शकत नाही. दिशाजी या आमच्या कुटुंबातील सदस्यासारख्या आहेत. पण आता त्यांचे लग्न झालं आहे. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. पण दिशा बेन असो किंवा निशा बेन दया ही शोमध्ये परत नक्की येणार. कारण आम्हाला लोकांचे मनोरंजन करायचे आहे. '


28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.


संबंधित बातम्या