Filmfare Awads Marathi 2021 : मराठी सिने कलाकारांचा आणि त्यांच्या कलाकृतींचा गौरव करणारा 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'  (Filmfare Awads) नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 


'कारखानीसांची वारी' या सिनेमासह 'झिम्मा' सिनेमानेदेखील 'फिल्म फेअर पुरस्कार' सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. अंकुश चौधरीला 'धुरळा' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर सई ताम्हणकरने 'धुरळा' सिनेमासाठी आणि नेहा पेंडसेने 'जून' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.






फिल्म फेअर मराठी पुरस्कार 2021 


सर्वोत्कृष्ट सिनेमा - झिम्मा आणि कारखानीसांची वारी
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अंकुश चौधरी (धुरळा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सई ताम्हणकर (धुरळा), नेहा पेंडसे (जून)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मंगेश जोशी (कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - रमण देवकर (म्होरक्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सिद्धार्थ जाधव (धुरळा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सोनाली कुलकर्णी (धुरळा), गीतांजली कुलकर्णी (कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट कथा - अच्युत नारायण


एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'ने पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार


मंगेश जोशी यांनी 'कारखानीसांची वारी' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. मोहन आगाशे, वंदना गुप्ते, अमेय वाघ, प्रदीप वेलणकर, गीतांजली कुलकर्णी आणि शुभांगी गोखले अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमातून एकत्रित कुटुंबाचं भावविश्व उलगडण्यात आलं आहे. 


संबंधित बातम्या


Filmfare Awads Marathi : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'ने पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार


Legends of Ramayana : डिस्कव्हरीवर येणार 'लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष'


Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसला कन्यारत्न, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha