Mrunal Dusanis : मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि निरज मोरे यांना कन्यारत्न झाले आहे. मृणालने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. 


मृणालच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 24 मार्च रोजी तिने मुलीला जन्म दिला आहे. आमची छोटी राजकुमारी आली आहे, असे म्हणत मृणालने निरज, मृणाल आणि बाळ अशा तिघांच्या हाताचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. 'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकेच्या माध्यमातून मृणाल घराघरांत पोहोचली आहे.





मृणालच्या मुलीचे नाव 'नूर्वी' असे आहे. याआधी मृणालने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत घरी छोटा पाहुणा येणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. 2016 साली नीरज पंडीत सोबत मृणाल लग्नबंधनात अडकली होती. मृणालने नीरजसोबत अरेंज मॅरेज केले होते. नीरज हा सॉफ्टवेअर इंजीनीअर आहे. मृणालच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


संबंधित बातम्या


RRR Box Office Collection Day 7: पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाह किती गल्ला जमवला?


Oscars 2022 :  'विल स्मिथला अटक करण्यासाठी तयार होते पोलीस, पण...'; ऑस्कर प्रोड्यूसरने दिली माहिती


The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चं तिकीट दाखवल्यावर सूट देण्याऱ्या दूध विक्रेत्याला धमक्यांचे फोन!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha