Anupamaa Fame Rupali Ganguly: रुपाली गांगुली (Rupali Ganguli) टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय मालिका 'अनुपमा'मध्ये (Anupama) दिसत आहे. या मालिकेनं रुपालीला तिच्या खऱ्या नावापेक्षा अनुपमा म्हणूनच ओळखू लागले. रुपाली गांगुलीच्या सीरिअलसोबतच तिच्या खऱ्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. रुपाली गांगुलीसोबतच्या मतभेदांमुळे सुधांशू पांडे, मदालसा शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांनी शो सोडला. पण आता, रुपालीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींबाबत चर्चा सुरू आहेत. रुपालीच्या सावत्र मुलीनं केलेल्या आरोपांमुळे ती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. एका सोशल मीडिया युजरनं दावा केला आहे की, ती अभिनेत्री रूपाली गांगुलीची सावत्र मुलगी आहे. आणि रुपाली गांगुलीनं तिच्या वडिलांना तिच्यापासून दूर ठेवलं आहे, याबरोबरच अभिनेत्रीवर इतर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 


सोशल मीडिया युजर ईशा वर्मानं ट्विटरवर लिहिलं आहे की, ती रुपाली गांगुलीचा पती अश्विन वर्मा यांची मुलगी आहे. त्यासोबतच तिनं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट टाकली आहे. तिनं लिहिलं आहे की, रुपाली गांगुलीनं तिच्या वडिलांना तिच्याच्यापासून दूर नेलं आहे. ईशा वर्मानं रिया चक्रवर्तीसारख्या अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले आहेत. रुपालीनं तिच्या वडिलांना ड्रग्ज देऊन आपल्या ताब्यात घेतल्याचं तिनं आपल्या आरोपात म्हटलं आहे. रियानं जसे सुशांत सिंह राजपूतसोबत केलं, तेच तिनं केलं आहे, असं ईशा वर्माचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही हे वृत्त केवळ सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टच्या आधारावर देत आहोत, यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.


अनेक वर्षांपूर्वी शेअर केलेली पोस्ट


ईशा वर्मानं सोशल मीडियावर अनेक वर्षांपूर्वी रुपाली गांगुली आणि अश्विन वर्मा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये रुपाली, तिचे पती आणि ईशा वर्मा एकत्र डिनर करताना दिसत आहेत. दरम्यान, ईशाच्या दाव्यानंतर तिच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 


रुपाली गांगुलीचे पती अश्विन के वर्मा यांनी एक्स पोस्टवर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. यावरुन रुपाली त्यांची दुसरी पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी लिहिलंय की, त्यांची धाकटी मुलगी तिच्या पालकांच्या घटस्फोटामुळे नाखूष आहे. घटस्फोटाचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो. त्यांनी लिहिलं आहे की, "माझ्या आधीच्या लग्नापासून मला दोन मुली आहेत. रुपाली आणि मी नेहमीच यावर अनेकदा चर्चा केली आहे. "मला या सगळ्यांची खूप काळजी आहे."


रुपाली ही अश्विनची दुसरी पत्नी... 


न्यूज 18 नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रूपाली गांगुली आणि अश्विन वर्मा यांनी 2013 मध्ये लग्न केलं होतं. अनुपमा फेम अभिनेत्री अश्विन वर्मा यांची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी त्यांचं लग्न सपना वर्मासोबत झालं होतं. सपना आणि अश्विन यांना दोन मुली देखील आहेत.