38 Year Old Actress Got Married For Second Time TO Baba: प्रसिद्ध मल्ल्याळम टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या श्रीधर (DIvya Shridhar) तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, तिनं अभिनेता आणि मोटिवेशनल स्पिकर क्रिस वेणुगोपाल (Kris Venugopal) यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली. क्रिस वेणुगोपाल 49 वर्षांचे आहेत. या जोडप्यानं आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.दोघांनीही 30 ऑक्टोबर रोजी आपली लग्नगाठ बांधली. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच, अनेकजण त्यांच्या नात्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.                              

दोघांच्या रिलेशनशिपबाबत बोलायचं झालं तर, ख्रिस वेणुगोपाळ आणि दिव्या श्रीधर यांची पहिली भेट टेलिव्हिजन शो पत्रमट्टूच्या सेटवर झाली होती, त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि काही काळानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता क्रिसनं लग्न करण्यापूर्वी दिव्या यांच्या मुलांकडूनही सल्ला घेतला होता. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिच्या मुलीनं क्रिससोबतच्या दुसऱ्या लग्नाचा स्विकार केला. 

क्रिस वेणुगोपाळ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, ते केवळ अभिनेतेच नाहीतर लेखकही आहेत. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन शो आणि पुल रायझिंग, संबवस्थलथु निन्नम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. क्रिस यांच्यासोबतच्या लग्नाबाबत दिव्यानं सांगितलं की, त्यांच्यासोबत लग्न करणं, हा तिच्या आयुष्यातील एक नवा अध्याय आहे आणि असा जोडीदार मिळाल्यानं ती खूप खूश आहे. 

मंदिरात बांधली लग्नगाठ                                   

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचा 49 वर्षीय पती एक मोटिवेशनल स्पिकर आणि वकील देखील आहे. 30 ऑक्टोबरला दोघांचं लग्न झालं आणि लग्नानंतर दोघेही एका मंदिराबाहेर एकमेकांचा हात धरून फिरताना दिसले. दोघांनीही अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. या अभिनेत्रीचं हे दुसरे लग्न असून तिने आपल्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याशी लग्न केल्यानं तिला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Divya Bharti: कित्येक आल्या अन् गेल्या, पण 'या' दिवंगत अभिनेत्रीचा 31 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड कुणीच मोडू शकलं नाही, फक्त तीन वर्षांच्या करिअरमध्ये दिलेत 13 हिट सिनेमे