Ankita Walawalkar Kunal Bhagat : बिग बॉस मराठीच्या यंदाचा पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सामील झालेली 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकर हिची सध्या लगीनघाई सुरु आहे. अंकिता वालावलकर तिच्या लग्नाच्या तयारीच्या अपडेट्स सोशल मीडियावर वेळोवेळी चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकतच अंकिताच पहिलं केळवण झालं आहे. अंकिताने तिच्या पहिल्या केळवळाचा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने खास उखाणा घेतला आहे. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हटके उखाण्याने लक्ष वेधलं आहे.
'बिग बॉस' फेम अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचा हटके उखाणा
सोशल मीडिया इन्फ्लुइंसर अंकिता वालावलकरच्या (Ankita Walawalkar) लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. सोशल मीडिया इन्फ्लुइंसर अंकिता वालावकरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमुळे खरी प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मराठीमुळे अंकिताचा नाव घराघरात पोहोचलं. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिने लग्नाची घोषणा केली होती. आता अंकिताच्या पहिल्या केळवणाची झलक तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि तिचा होणारा नवरा कुणाल भगत दोघेही एकत्र दिसत आहे. अंकिता आणि कुणालच्या या गोड व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
"वालावलकरांची पोरगी पटवली..."
अंकिता आणि कुणालच्या केळवणासाठी खास सजावट केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांच्या समोर जेवणाचं ताट दिसत आहे. ज्यामध्ये खास बासुंदी, मोदक, बटाटावडा, पुलाव असा खास मेन्यूही दिसत आहे. या ताटाच्या भोवती फुलांची रांगोळी काढण्यात आली असून कुणाल आणि अंकिताचं नावही लिहिण्यात आलं आहे. अंकिता आणि कुणाल एकमेकांना प्रेमाने मोदक भरवतानाही दिसत आहेत.
केळवणाचा VIDEO चर्चेत
केळवणावेळी अंकिता आणि कुणालने खास नाव घेतलं. एकमेकांना मोदक भरवण्याआधी अंकिता आणि कुणालने नाव घेतलं. अंकिताने उखाणं घेताना म्हटलं की, "समोर आहे बासुंदी खायची झालीये मला घाई, कुणालचं नाव घेते सुरू झाली लगीनघाई". यानंतर कुणालने घेतलेला लयभारी उखाणा मात्र नेटकऱ्यांना जास्तच भावला आहे. उखाणं घेताना कुणाल म्हणाला, "पाटावर पाट, पाटाखाली भुंगा, वालावलकरांची पोरगी पटवली ढांगचिकढींगा". कुणालचा हा हटके उखाणा लक्षवेधी ठरला आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :