Almost Comedy : 'ऑलमोस्ट कॉमेडी' हा नवीन मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत या शोकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.  दर्जेदार आणि मनोरंजक कंटेट देणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवा मार्ग शोधला आहे. याशोमधून आता लेखक कॉमेडीयन बनणार आहेत. हा शो कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे, ते जाणून घ्या.


लेखक बनणार कॉमेडीयन


अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर 'ऑलमोस्ट कॉमेडी' चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. मनोरंजक कथा लिहून प्रेक्षकांना हसवणारे लेखक आता प्रत्यक्ष स्टेजवर येऊन आपल्या विनोदी किस्से सांगून प्रेक्षकांना हसवणार आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील काही उत्कृष्ट लेखक प्रथमच स्टेजवर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत या लेखकांचा समावेश असणार आहे.  


मराठी स्टँडअप कॉमेडी शो 'ऑलमोस्ट कॉमेडी' 


एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने  ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफी आणि बरंच काही’ ‘बॅाईज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एक धमाकेदार संकल्पना घेऊन येत आहे. प्रेक्षकांना हास्याच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सज्ज झाले आहे. 


'ऑलमोस्ट कॉमेडी' म्हणजे फुल ऑन हास्याचा धमाका


एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत 'ऑलमोस्ट कॉमेडी' हा धमाकेदार कॉमेडी शो एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची ही नवीन संकल्पना प्रेक्षकांसाठी नव वर्षातील खास भेट ठरेल. 'ऑलमोस्ट कॉमेडी' हा शो फक्त एक कॉमेडी शो नसून लेखकांच्या कलागुणांची एक मजेशीर सफर असणार आहे. या शोचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल हे नक्की.






एव्हरेस्ट एंटरटेमेंटचे संस्थापक संजय छाब्रिया यांनी सांगितलं की, "स्टँडअप कॉमेडी हा मनोरंजनाचा एक वेगळा आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होणारा फॉरमॅट आहे. म्हणूनच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा नवा प्रयोग, नवी संकल्पना आम्ही घेऊन आलो आहे".


महत्त्वाच्या इतर बातम्या :


प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल