Shraddha Kapoor Rumoured Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात चाहते आहेत. स्त्री 2 चित्रपटापासून तिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तरुणाईमध्ये श्रद्धा कपूरची प्रचंड क्रेझ आहे. श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या प्रोफेशनल तर कधी पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. श्रद्धा कपूरच्या रिलेशनशिपबद्दलच्या अनेक अफवा समोर येत असतात. दरम्यान, आता पुन्हा एकदा तिच्या पर्सनल लाईफची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच ती मुंबईमध्ये स्पॉट झाली, यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यात श्रद्धा कपूरचा वॉलपेपर दिसला. या वॉलपेपरमुळे चर्चांना उधाण आलं आहे.   


श्रद्धा कपूरच्या फोनमध्ये बॉयफ्रेंडचा वॉलपेपर


अभिनेत्री श्रद्धा कपूर रविवारी मुंबईत काही कामासाठी बाहेर गेली, तेव्हा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी तिचा मोबाईल वॉलपेपर त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. श्रद्धाने तिच्या मोबाईल वॉलपेपरवर एका खास व्यक्तीसोबतचा फोटो पाहून सर्वच अवाक झाले आहेत. हा वॉलपेपर पाहिल्यानंतर श्रद्धाने तिच्या वॉलपेपरवर लावला आहे, ती खास व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे. 


मीडियाच्या कॅमेऱ्याने उलगडलं गुपित


श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तिचा फोन वॉलपेपर दिसत आहे. तिचा फोन वॉलपेपर पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहे. श्रद्धाने रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदी याचा फोटो वॉलपेपरवर लावला आहे. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. प्रत्येकजण व्हिडीओ झूम करुन फोटोतील व्यक्ती राहुल मोदी आहे की नाही, याची शहनिशा करत आहे. दरम्यान, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या बातम्या समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. या अफवा गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. आता चाहत्यांना या अफवा खऱ्या असल्याचं सिद्ध करण्यासाठी एक मोठा पुरावा मिळाला आहे.






कोण आहे श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड?


श्रद्धा कपूरचे चाहते तिच्या मोबाईलच्या वॉलपेपरचा फोटो पाहून सतत त्यावर प्रतिक्रिया देत कमेंट्स पोस्ट करत आहेत. अनेक चाहते म्हणतात की, फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसारखी दिसते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्रद्धा कपूरने राहुल मोदी सोबतचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता. या स्टोरीमध्ये तिने राहुलला टॅग केलं होतं, ज्यामुळे चांगलीच खळबळ माजली होती.


राहुल मोदी कोण आहे?


श्रद्धा कपूरचा रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहेत.  2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटात श्रद्धाने राहुल मोदीसोबत काम केले होते. याशिवाय राहुलने 'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा आणि राहुल 'तू झुठी मैं मक्कर' चित्रपटादरम्यान जवळ आले आणि एकत्र काम करताना त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, असं बोललं जातं.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


आधी महादेवाचा भक्त, अभिनेत्याने लग्नासाठी स्वीकारला इस्लाम, पूजा-पाठ करणारा आता 5 वेळा नमाज अदा करतो; पत्नीवर लव्ह-जिव्हादचा आरोप