Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. दिवसेंदिवस या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सुशांत सिंह राजपूतबद्दलच्या (Sushant Singh Rajput) नात्याबद्दल भाष्य केलं होतं. आता पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणीत अंकिता भावूक झाली आहे. सुशांतच्या करिअरबद्दल भाष्य करताना अंकिताला अश्रू अनावर झाले होते.


सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावूक


अंकिता लोखंडेने अभिषेक कुमार (Abhishek Kumar) गप्पा करताना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल (Ankita Lokhande On Sushant Singh Rajput) भाष्य केलं आहे. 'बिग बॉस 17'चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता 'बिग बॉस 17'मधील गार्डन एरियामध्ये बसलेली दिसत आहे. त्यावेळी तिच्यासोबत अभिषेक कुमारदेखील आहे. 


सुशांतच्या (SSR) आठवणीत भावूक होत अंकिता लोखंडे म्हणाली,"सुशांत खूप मेहनती होता. सुशांतच्या संघर्षाला तोड नाही. एका वेगळ्या प्रकारचा संघर्ष त्याने केला आहे". सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले आहेत. अंकिताला अश्रू अनावर झाल्याने अभिषेक तिला म्हणतो की,"सुशांत सिंह राजपूतबद्दल तुझ्यासोबत मी कधीही बोलणार नाही, असं मी ठरवलं होतं". यावर अंकिता म्हणते,"या विषयावर बोलायला मला आवडतं. ते दिवस आठवतात. त्याचा अभिमान वाटतो". 






एका रात्रीत अंकिता लोखंडेचं आयुष्य बदललं 


सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेचा खूप त्रास झाला होता. एका रात्री तिचं आयुष्य बदललं होतं. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,"सुशांतच्या जाण्याचा मला मोठा धक्का बसला होता. माझ्यासह माझ्या आई-वडिलांसाठीदेखील हे खूप धक्कादायक होतं. सुशांत सिंह राजपूत खरा कसा आहे हे लोकांना सांगण्याचा आजवर मी प्रयत्न केला आहे". 


अंकिता पुढे म्हणाली,"सुशांतच्या निधनानंतर मला खूप ट्रोल केलं गेलं. सुशांतच्या आयुष्यात मी असते तर त्याने आत्महत्या केली नसती असं लोकांचं मत होतं. पण सुशांतने माझ्यासोबत ब्रेकअप केला त्यावेळी हे लोक कुठे होते? त्यामुळे माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा, असं सुशांत सिंह राजपूतला या लोकांनी का नाही सांगितलं". 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतचा ब्रेकअप 'या' कारणाने झालेला; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली,"एका रात्रीत आयुष्य बदललं"