Bigg Boss 17 Updates:   छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17  (Bigg Boss 17)  या कार्यक्रमामध्ये सध्या स्पर्धकांमध्ये भांडण होत असल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. आता निल भट्ट (Neil Bhatt) आणि ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे. नुकताच  बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये  निल आणि ऐश्वर्या हे एकमेकांवर ओरडताना दिसत आहेत. 


बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा  बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निल आणि ऐश्वर्या हे खाली पडलेले सामान गोळा करत एकमेकांना ओरडताना दिसत आहेत. अशातच घरातील इतर सदस्य हे निल आणि ऐश्वर्या यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.


जेव्हा अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, नील आणि ऐश्वर्या  हे काही किराणा सामान दूर ठेवण्याचा निर्णय घेतात तेव्हा नील आणि ऐश्वर्यामध्ये भांडण होते. नील आधीच सामान घेऊन जात असताना ऐश्वर्या बॅग देण्यासाठी जाते.  तेव्हा ऐश्वर्या नीलला म्हणते, "मी काही बोलत असताना तुला दिसत नाहीये का?" नील म्हणतो, "माझे हात रिकामे नाहीयेत, तुला दिसत नाहीत का?"


पाहा व्हिडीओ:






काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये भांडण झालं होतं. अभिषेक आणि ईशासोबत बसून बोलत होता तेव्हा,  अंकिता तिथून जाते. विकी अभिषेक हे बोलत आहे हे बघून अंकिता चिडते.अंकिताचे हे वागणे विकीला आवडत नाही आणि तो चिडतो. नंतर विकी त्याची बायको अंकितासोबत बसून बोलतांना दिसतो आणि या दरम्यान तो अंकितावर ओरडायला लागतो.


विकी जैन, अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात पुन्हा भांडण; ईशामुळे अभिषेक आणि समर्थमध्ये झाली बाचाबाची, पाहा व्हिडीओ