Birthday Special Anita Date Kelkar : छोट्या पडद्यावरील अनेक मालिका गाजतात आणि त्यातील कलाकार घराघरात पोहोचतात. काही टीव्ही मालिका विशेष गाजतात आणि त्यातील कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं. अशीच एक मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी यातील पात्र आणि त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात आजही तितक्याच ताज्या आहेत. 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुले अभिनेत्री अनिता दाते-केळकर हे नाव घराघरात पोहोचलं. आज अभिनेत्री अनिता दाते-केळकरचा वाढदिवस असून तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.


लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं, टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल होती. अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिला 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. अनिता दातेने साकारलेली राधिकाची भूमिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. पतीचं एक्ट्रा मॅरिटल अफेअर समोर आल्यानंतर खंबीर राहून तिने त्या परिस्थितीशी सामना केला. आज प्रेक्षकांची लाडकी राधिका म्हणजेच  अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिचा वाढदिवस आहे.


'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे प्रसिद्धी


सध्या अनिता दाते इंद्रायणी या मराठी मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिला खरी प्रसिद्धी 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे मिळाली. तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. याआधी अनिता 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'दार उघडं ना गडे', 'अग्निहोत्र', 'मंथन', 'अनामिका' या टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. अनिताचं लेखक-अभिनेता चिन्मय केळकरसोबत लग्न झालं आहे. अनेकांना यांची लव्ह स्टोरी माहित नसेल. पण, लग्नाआधी दोघं लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यांची रंजक लव्ह स्टोरी वाचा.



इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी


अनिता दातेचा जन्म 31 ऑक्टोबर 1980 ला नाशिकमध्ये झाला. तिने पुण्यातील ललित कला केंद्रामध्ये प्रवेश केला आणि नाट्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ललित कला केंद्रामध्ये अनिताची भेट चिन्मयसोबत झाली. पण, इथे यांचं प्रेम जुळलं नाही. त्याचं प्रेम एका नाटकादरम्यान खुललं.  सिगारेट्स नाटकाच्या तालमीनंतर आम्ही एकमेकांना मिस करायला सुरु केलं, असं चिन्मयने एका मुलाखतीत सांगितलं होतं.


लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये


सिगारेट्स नाटकामध्ये चिन्मय आणि अनिता यांनी एकत्र काम केलं. या नाटकाच्या तालमीसाठी अनिता दररोद नाशिक-पुणे असा प्रवास करत होती. कामाप्रची अनिताची जिद्द पाहून चिन्मय तिच्य प्रेमात पडला. चिन्मयने अनिताकडे मनातील भावना व्यक्त केल्या, पण सध्या लग्न करायचं नसल्याचंही स्पष्ट केलं. यानंतरही अनिताने त्याला होकार दिला आणि दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली. एकमेकांची अनुरुपता तपासण्यासाठी हा काळ महत्त्वाचा होता. दोन वर्ष दोघे लिव्ह इनमध्ये होतो. पण, नंतर एक काळ असा आला की, आम्ही लग्न केलंय की नाही, हे कळणं अवघड झालं आणि तेव्हा दोघांनी लग्न केलं. अनिता आणि चिन्मय यांच्या लग्नाला 16 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे मात्र त्यांच्या नात्यातील टवटवीतपणा आजही कायम आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Singham Again : अर्जून कपूर बॉक्स ऑफिसवर लागोपाठ फ्लॉप, तरीही रोहित शेट्टीने सिंघम अगेनसाठी निवडलं; कारण जाणून घ्या...