Bigg Boss Season 18 : बिग बॉस सीझन 18 सध्या तुफान चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरातील सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. रजत दलाल बिग बॉस 18 च्या घरात नेहमीच निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बिग बॉसच्या घरात रजतची कोणाशीही मैत्री किंवा वैर नाही, पण तो ईशा सिंहला आपली बहीण मानतो. बिग बॉसच्या घरात ईशा सिंहने अनेकदा रजतला तिच्या ग्रुपविरोधात जाऊन पाठिंबा दिला आहे. पण रजत दलालच्या मनात ईशाबद्दल वेगळ्याचं भावना आहेत. रजतला ईशाबद्दल काही वेगळंच वाटतं आणि बिग बॉसने रजतचा खरा चेहरा ईशासमोर आणला आहे.
बिग बॉसच्या घरात रजत दलालची जीभ घसरली
बिग बॉसने ईशा सिंहला कनफेशन रुममध्ये बोलावलं, यावेळी विवियन डिसेनाही त्याच्यासोबत होता. कनफेशन रुममध्ये बिग बॉसने ईशा आणि विवियनसमोर रजतचं पितळ उघडं पाडलं. बिग बॉसने कनफेशन रुममध्ये पोहोचलेल्या ईशाला सांगितलं की, घरात तुमच्याबद्दल काही बोललं गेलं आहे, ते तुम्हाला दाखवावं, असं आम्हाला वाटलं. म्हणूनच आम्ही ही व्हिडीओ क्लिप तुमच्या समोर चालवत आहोत.
विवियनने ईशाला दिला सल्ला
रजतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ईशाला मोठा धक्का बसला. रजत आपल्याबाबत नेमका काय विचार करतो, हे ऐकून तिला विश्वासच बसला नाही की, तिला बहीण मानणारा रजत तिच्याबद्दल असं बोलला आहे. व्हिडीओ क्लिप पाहिल्यानंतर विवियन आणि ईशा दोघेही बाहेर आले. ईशा विवियनला सल्ला विचारते की, तिने रजतशी याबाबत बोलावं का? तेव्हा विवियनने ईशाला सल्ला देत सांगतो की, सध्या रजतशी बोलण्याची गरज नाही.
रजत दलालचं आक्षेपार्ह वक्तव्य
बिग बॉसने ईशा आणि विवियनला व्हिडीओमध्ये, रजत म्हणत होता की, "नेहमी इतरांना सांगायचं असतं, नंतर एक प्रोजेक्शन द्यायचं असतं आणि आपला **** विकून तिथून निघून जायचं असतं. ती फक्त भाऊ म्हणते, बाकी काही नाही. फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती अविनाशला चावी देते आणि अविनाश चालू होचो. हा ईशाचा खेळ आहे, त्या दोन मुलींना अक्कल आहे म्हणून ते अविनाशच्या पाठिंब्यावर पुढे जात आहेत".
ईशा सिंहचा रजत दलालला टोमणा
कन्फेशन रूममधून बाहेर पडून ईशा, एलिस, अविनाश आणि रजत यांच्यामध्ये डायनिंग टेबलवर बसली. त्यांना पाहून रजतने ईशाला विचारलं की, तुला काय बोललो होतो ते आठवतंय का? त्यानंतर ईशाने रजतला टोमणा मारला आणि म्हणाली की, मला सर्व काही चांगल्याप्रकारे आठवतं आहे. पण, रजतला ईशाचा टोमणा समजला नाही आणि त्याने पुन्हा ईशाला विचारलं की, सर्व काही क्लिअर झालं आहे का? तेव्हा ईशा म्हणाली, "हो नक्कीच, बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत." रजतचे बोलणं ऐकून बिग बॉसनेही ईशाला विचारलं की ईशा, तू कॉफी घेतलीस आणि झोप उडाली का? त्यानंतर ईशान बिग बॉसच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली की, "होय, आता माझी झोप कॉफीशिवाय पूर्ण उडाली आहे".
पाहा व्हिडीओ : ईशाबद्दल नेमकं काय म्हणाला रजत दलाल?
महत्त्वाच्या इतर बातम्या :