एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
KBC 9 मध्ये 1 कोटी जिंकणारी पहिली महिला!
1 कोटी रुपये जिंकल्यानंतर अनामिका म्हणाली की, 'मोठी रक्कम जिंकता यावी यासाठीच मी या शोमध्ये सहभागी झाली होती. पण मी विचार नव्हता केला की, मी कोट्यधीश होईल.'
मुंबई : 'कोन बनेगा करोडपती'च्या 9 व्या मोसमात झारखंडची अनामिका मजुमदार हिनं नवा इतिहास रचला आहे. या मोसमातील ती पहिली करोडपती महिला ठरली आहे. तिने 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देत ही किमया साधली. पण तिला सोळाव्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे तिला 7 कोटी जिंकता आले नाही.
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये राहणारी अनामिका ही 'फेथ इन इंडिया' नावाची एनजीओ चालवते.
1 कोटी रुपये जिंकल्यानंतर अनामिका म्हणाली की, 'मोठी रक्कम जिंकता यावी यासाठीच मी या शोमध्ये सहभागी झाली होती. पण मी विचार नव्हता केला की, मी कोट्यधीश होईल.'
अनामिकानं पुढील 15 प्रश्नांची अचूक उत्तर देऊन तब्बल 1 कोटी रुपये जिंकले.
1. 2017 मधील कोणता सिनेमा आहे की ज्यामध्ये आयुष्मान खुरानानं काम केलं होतं
बरेली की बर्फी
2. यापैकी कोणत्या सणावेळी विवाहित बंगाली महिला या 'सिंदूर खेला' खेळतात
दुर्गा पूजा
3. पद्मश्री पुरस्कार विजेते तरला दलाल आणि संजीव कपूर हे कोणत्या क्षेत्रातील आहे.
पाक कला
4. संर्पगंधा आणि अश्वगंधा हे कशाचे प्रकार आहेत
झाडाचे
5. अस्थायी आवास, कॅम्प या शब्दाचा हिंदी अर्थ काय आहे?
डेरा
6. हा आवाज कुणाचा आहे? - या वेळी एका अभिनेत्रीचा आवाज ऐकवण्यात आला होता.
विद्या बालन
7. कोणत्या राजकारणी आणि नागरिक अधिकारी कार्यकर्तेला 'आर्यन लेडी' नावानं ओळखलं जातं.
इरोम शर्मिला
8. कोणता पक्षी सर्वात उंच उडतो आणि जो आपल्या एकाच पार्टनरसोबत आयुष्य घालवतो?
सारस क्रेन
9. जर निर्मला सीतारमन भारतच्या दुसऱ्या संरक्षणमंत्री आहेत तर पहिल्या संरक्षणमंत्री कोण होत्या?
इंदिरा गांधी
10. 2017 साली टाटा सन्सच्या चेअरमनपदी कोण विराजमान झालं?
एन. चंद्रशेखरन
11. 'कर के दिखला दे गोल' हे प्रमोशनल गाणं कोणत्या स्पर्धेसाठी आहे?
फिफा अंडर 17 वर्ल्ड कप
12. महाभारतात सांगितल्याप्रमाणे, यापैकी कोणी दोन वेगवेगळ्या स्वरुपात दोन आईंच्या उदरातून जन्म घेतला?
जरासंध
13. जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळातील कोणत्या सदस्यानं त्यागपत्र देऊन 1951 साली नव्या पक्षाची स्थापना केली होती?
श्यामा प्रसाद मुखर्जी
14. मित्रभेद, मित्रलाभ, काकोलुकीयम्, लब्धप्रणाश और अपरीक्षित-कारकम् हे कोणत्या ग्रंथातील विभिन्न अध्यायाचे भाग आहेत?
पंचतन्त्र
15. यापैकी कोणत्या चित्रकाराकडे भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीच्या चित्रणाचं काम सोपवण्यात आलं होतं?
नंदलाल बोस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
भविष्य
Advertisement