Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो आणि वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. ऐश्वर्यानं नुकतेच Ask Me A Question हे सेशन इन्स्टाग्रामवर केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची ऐश्वर्यानं उत्तरं दिली आहे.
- नेटकऱ्याचा प्रश्न- ऐश्वर्या की पल्लवी, तुम्हाला कोणते नाव जास्त आवडते. तुम्ही तुमचं खरं नाव का लावत नाही?
- ऐश्वर्याचं उत्तर- दोन्हीही नावं खरीच आहेत.
- नेटकऱ्याचा प्रश्न-तुमच्या ग्लोइंग आणि अँटी एजिंग स्किनमागील रहस्य काय आहे?
- ऐश्वर्याचं उत्तर- वर्क आऊट+ हेल्थी लाईफस्टाईल+ हॅपी फॅमिली
- नेटकऱ्याचा प्रश्न- मॅडम तुमच्या कपाळावरील मार्क खूप छान दिसतो. पण तुमच्या कपाळावर काय झालंय?
- ऐश्वर्याचं उत्तर- बर्थ मार्क
- नेटकऱ्याचा प्रश्न-तुम्ही सोशल मीडियावरील ट्रोलिंग कसे हँडल करता?
- ऐश्वर्याचं उत्तर-इग्नोर करते.
ऐश्वर्या ही पती अविनाश नारकरसोबत (Avinash Narkar)सोबतचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर 187k फॉलोवर्स आहेत.
ऐश्वर्यानं अनेक हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ये प्यार ना होगा काम,घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्ये तिनं काम केलं.
ऐश्वर्यानं नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. गंध निशिगंधाचा, सोयरे सकळ,सोनपंखी या नाटकांमध्ये ऐश्वर्यानं काम केलं. तसेच तुच माझी भाग्य लक्ष्मी,कधी आचानक, अंक गणित आनंदाचे या मराठी चित्रपटांमधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली. ऐश्वर्याची ताली ही वेब सीरिज काल रिलीज झाली. ऐश्वर्याच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. सध्या ऐश्वर्या ही सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
संबंधित बातम्या