Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)

  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये कलाकार, राजकीय नेते हजेरी लावतात. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte)   यांनी हजेरी लावली होती.  आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा अवधूत गुप्तेनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना दिसणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत हा सुबोधला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.


खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुबोध भावे हा राहुल देशांपडे यांची अॅक्टिंग करताना दिसत आहे. तसेच नुकताच सुबोधनं अवधूतसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'येत्या रविवारी!!' खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा आगामी एपिसोड रविवारी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. प्रेक्षक या एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाच्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नक्की बघणार', तर सुबोधनं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आधी सई नंतर सुबोध, आता आम्ही मुक्ता बर्वेची वाट बघत आहोत.'






खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कलाकार मजेशीर किस्से तसेच आठवणी सांगतात. 


सुबोध भावेचे चित्रपट


आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व, फुलराणी,हर हर महादेव, वाळवी यांसारख्या चित्रपटांमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच  'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' या सीरिजमध्ये देखील त्यानं काम केलं. सुबोध त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Vandana Gupte: 'माझ्या नव्या गाडीचं प्लास्टिक कव्हर फाडलं...'; वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा मजेशीर किस्सा